Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पत्रकार संघाच्या वतीने स.पोलिस निरीक्षकांचा सन्मान

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघ नगर तालुका यांच्या वतीने नगर तालुका पोलीस ठाण्याचा जिल्ह्यातील उत्कृष्ट पोलीस ठाणे म्हणून गौरव झाल्याबद्दल सम्मान करण्यात आला.
   नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी विविध गुन्ह्यांचे तपास,चोरीतील गुन्हातील उकल मुद्देमाल हस्तगत व मोक्का अंतर्गत कार्यवाही केल्याबद्दल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून उत्कृष्ट पोलीस ठाणे म्ह्णून सन्मान करण्यात आला.


यावेळी बोलताना पत्रकार संघटनेचे नगर तालुकाध्यक्ष अन्सार शेख म्हणाले की नगर तालुका पोलीस ठाणे विविध गुन्ह्यांची उकल करत अनेक आरोपींना गजाआड केले आहे त्याच बरोबर नगर तालुक्यातील अनेक गंभीर गुन्ह्यांचे विषय निकाली काढत नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे त्यामुळे नगर तालुका पोलिस ठाण्याचे प्रतिमा सर्वसामान्य जनतेमध्ये विश्वास सार्थ झाली आहे असे मत व्यक्त केले.
  नगर तालुका ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने महिंद्र भिंगारदिवे यांनी तालुका पोलीस ठाण्याचे आभार मानले यावेळी पत्रकार संघाचे सबील सय्यद, शिवा मस्के, रफिक शेख,शितल बेद्रे ,बाबासाहेब तिपोळे,संजय वायकर,अशोक तांबे,रियाज पठाण, श्याम कांबळे ,रवींद्र कदम आदि उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments