Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सिमेंटचा अपहर करून पळून गेलेला आरोपी जेरबंद ; नगर 'एलसीबी'ची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - औरंगाबाद जिल्ह्यातील चिखलठाणा येथे सिमेंटचा अपहार  करून पळून गेलेल्या आरोपीस नगर तालुक्यातील अकोळनेर शिवारात पकडण्यात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. गणेश अंबादास खेडकर (वय 32 रा. रा.खुपटी, ता. शिरूर कासार जि. बीड) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे सफौ नानेकर, पोहेकाॅ  भाऊसाहेब काळे,   विजयकुमार वेठेकर,  पोना शंकर चौधरी,  रविकिरण सोनटक्के, पोकाॅ योगेश सातपुते आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
 याबाबत समजलेली माहिती अशी की, चिखलठाणा (जि.औरंगाबाद) पोलीस ठाण्यात सिमेंट काँक्रेट प्लांटचे व्यवस्थापक चिडी शंकरराव विश्वनाथन यांच्या फिर्यादीवरून टँकर चालक गणेश अंबादास खेडकर व प्लांट सुपरवायझर विक्रम देव सामंत याच्याविरुद्ध 340/2021 भादवी कलम 406, 407, 408, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दाखल गुन्ह्यातील आरोपीबाबत अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीनुसार टँकर चालकाचा शोध घेतला असता, अकोळनेर ते भोरवाडी रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या टँकर चालक खेडकर याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात घेतले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, टँकरवर चालक म्हणून काम करतो. टँकरमध्ये असलेले सिमेंट हे समृद्धी महामार्गाची पळशी (जि. औरंगाबाद) येथील सिमेंट काँक्रीट प्लांटमधून येथील सुपरवायझरला हाताशी धरून बाहेर विक्री करण्यासाठी आणल्याचे आरोपी खेडकर याने सांगितले.

Post a Comment

0 Comments