Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

तरुणांनी नोकरीच्या प्रयत्नासह व्यावसायिक ज्ञान घ्यावे : भाजपा जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे


 
👉चिंचपुर पांगुळ येथे श्री गणेश स्टेशनरी
अँण्ड काँम्पुटर शुभारंभ
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : सध्याची परिस्थिती पहात तरुणांना व्यावसायिक ज्ञान मिळविणे आवश्यक आहे. समाजातील तरुणांनी नोकरीच्या प्रयत्नासह व्यावसायिक ज्ञान घ्यावे, असे प्रतिपादन माजी सरपंच तथा भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष धनंजय बडे पा. यांनी केले.


 चिंचपूर पांगुळ येथील श्री गणेश  स्टेशनरी अँण्ड काँम्पुटर शुभारंभाप्रसंगी श्री बडे हे बोलत होते. यावेळी उदघाटन  परमेश्वर महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी दादासाहेब बारगजे, श्री गणेश  स्टेशनरी अँण्ड काँम्पुटरचे संचालक नारायण बारगजे, दत्तात्रय बारगजे आदिंसह मान्यवर उपस्थित होते.
श्री बडे पा.पुढे म्हणाले की, सर्वच क्षेत्रात सध्या स्पर्धा आहे. परंतु ज्यांच्याकडे सिक्ल आहे, तोच व्यक्ती प्रगती करू शकतो. यासाठी तरुणांनी यशस्वी उद्योगजकाचे अनुभव एकले पाहिजेत, त्यातून प्रेरणा मिळते. तसेच सध्याची कोरोना परिस्थिती पहात प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. आरोग्यदायी जीवन जगण्यासाठी  व्यसनापासून दूर रहावे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूञसंचालन पञकार सोमराज बडे यांनी केले. यावेळी वासुदेव बडे, सोमनाथ बडे, अमोल सांळुके, बाळु बारगजे, नवनाथ बारगजे, शिवाजी बारगजे, अर्जुन ढाकणे आदिंसह चिंचपूर पांगुळ ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments