Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गाडी पासिंगसाठी पैसे घेऊ बनावट नंबर देत फसवणूक ; कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- आरटीओ ऑफिसमधून गाडी पासिंग करण्यासाठी 92 हजार रुपये घेऊन बनावट नंबर देत फसवणूक केल्याची घटना अहमदनगर येथे उघडकीस आली आहे. याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात पाथर्डी येथील एकावर गुन्हा दाखल झाला आहे.


 याबाबत समजलेली माहिती अशी की, दि. 30 नोव्हेंबर 2020 ते दि.19 जानेवारी 2019 या कालावधीत आरटीओ ऑफिस चांदणीचौक अहमदनगर या ठिकाणी असणारा पाथर्डी येथील एकाने याने टाटा अल्ट्रोज गाडी ही उत्तरप्रदेश येथून अहमदनगर या ठिकाणी पासिंग करण्यासाठी चेकद्वारे व फोन पे द्वारे 92 हजार रुपये रक्कम घेतली. यावेळी त्याने बनावट नंबर एमएच 16 सीव्ही 9690 हा देऊन फसवणूक केली आहे, या पांडुरंग नाना साठे (रा. सावली सोसायटी केडगाव, भूषणनगर अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात 497 / 2021 भादवी कलम 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास पोसई शिरसाठ हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments