Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर कोतवाली पोलिस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - बकरी ईदच्या पार्श्‍वभूमीवर अहमदनगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक शनिवारी (दि. 17) सायंकाळी पार पडली. या बैठकीस कोतवालीचे पो. नि. राकेश मानगांवकर, तोफखान्याच्या पो. नि. श्रीमती गडकरी व भिंगार कॅम्पचे सपोनि शिरिषकुमार  देशमुख हे उपस्थित होते. 

बैठकीदरम्यान कोरोनाच्या काळात बकरी ईद साजरी करताना मुस्लिम बांधवांनी नियमाचे पालन करावे व सण शांतता साजरा करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावेत, असे आवाहन शहर पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री ढुमे यांनी केले. 
यावेळी  शांतता कमिटी पदाधिकाऱ्यांनी बकरी ईद सणानिमित्त नगर शहरात सण साजरा करताना येणाऱ्या अडचणीसह येणा-या समस्या पोलीस प्रशासनासमोर मांडल्या.
Post a Comment

0 Comments