Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

अहमदनगर जिल्ह्यात ८१ गुन्हेगारांच्या तपासणीत १४ गुन्हेगार अटक ; एलसीबीची धडकेबाज कारवाई

 
👉अवैध शस्त्र शोध मोहिमेअंतर्गत श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यात धडक मोहीम 
👉७ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतूसे व ३ तलवारी जप्त 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्ह्यात प्रथमच  राबविण्यात आलेल्या अवैध शस्त्र शोध मोहिमेअंतर्गत श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यामधून ८१ गुन्हेगारांच्या तपासणी करुन १४ गुन्हेगार अटक करण्यात येऊन  त्यांचेकडून ७ गावठी कट्टे, ८ जिवंत काडतूसे व ३ तलवारी असा एकूण २ लाख १३ हजार ९०० रु. किं. ची अवैध शस्त्रे जप्त करण्याची मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांसह  श्रीरामपूर, शेवगाव पोलिसांनी केली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील  यांचे आदेशानुसार अपर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक   दिपाली काळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे  व  नियंत्रण कक्ष तथा पोलीस उपअधिक्षक मुख्यालयाचे पो.नि. बाजीराव पोवार यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे  पोनि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोनि  रणजित डेरे, पोनि मसूद खान, पोनि  विजय करे, पोनि संजय सानप, पोनि नंदकुमार दुधाळ, सपोनि सोमनाथ दिवटे, सपोनि रामचंद्र करपे, सपोनि सचिन बागूल, पोसई गणेश इंगळे आदिंसह जिल्ह्यातील २५ पोलीस उपनिरीक्षक व ३५० पोलीस अंमलदार यांचे वेगवेगळे तयार केलेल्या पथकांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडणा-या गुन्हेगारी घटनामध्ये गुन्हेगारांकडून वारंवार गावठी कट्ट्याचा वापर होत होता. प्रामुख्याने जिल्ह्यातील नेवासा, श्रीरामपूर व राहूरी या तालुक्यामध्ये गावठी कट्टयांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर होत असल्याने  जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नगर जिल्ह्यामध्ये अग्निशस्त्रांचा वापर करून गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची माहिती संकलित केली. यानंतर  कारवाई करण्याबाबतच्या सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे श्रीरामपूर, नेवासा व राहूरी तालुक्यातील ८१ सराईत गुन्हेगारांची माहिती संकलित केली. सदर गुन्हेगारांचे 
श्रीरामपूर व अहमदनगर उपविभागीय दंडाधिकारी व  यांचेकडून सर्च वॉरंट घेण्यात आले होते.
यानंतर गुरुवारी (दि.२९) जुलै रोजी सकाळपासून पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी श्रीरामपूर, नेवासा व राहुरी तालुक्यामध्ये कारवाई करुन ८१ गुन्हेगारांच्या घरझडत्या घेऊन अवैध शस्त्राचां शोध घेण्यात आला.  
ताब्यात घेण्यात आलेल्या वरील नमुद गुन्हेगारापैकी खालील आरोपी विरुध्द यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, मारामारी, खूनाचा प्रयत्न, अवैधरित्या शस्त्र बाळगणे, विनयभंग, चोरी, दरोड्याची तयारी करणे अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
या कारवाई दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले गुन्हेगार याप्रमाणे  आकाश उर्फ देवा जालिंदर लष्करे (रा. संभाजीनगर, नेवासा फाटा, ता. नेवासा), रितेश पुनमचंद साळवे (रा. मक्तापूर, ता. नेवासा), शुभम विश्वनाथ गजें ( रा. वडुले, ता. नेवासा), लक्ष्मण सहादू अडांगळे (रा. गंगानगर, ता. नेवासा), शाहरुख युनूस पटेल (वय २५, रा. संजयनगर, वार्ड नं. २ श्रीरामपूर), अनिल बाळू इरले (रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी),  कैलास राम धोत्रे (रा देवळाली प्रवरा, ता. राहुरी), काशिनाथ बबन शिंदे ( वय ३५, रा. वैदूवाडी, सावेडी, अहमदनगर),  शाहरुख उर्फ चाट्या जावेद शेख ( रा. घोडेगाव, झोपडपट्टी, ता. नेवासा), अनिल कचरु साळूंके (रा. जाधव गल्ली, गंगापूर, औरंगाबाद), मयूर दिपक तावर (रा. वार्ड नं. ३, श्रीरामपूर),  नागेश पाराजी जाधव, (रा. त्रिंबकपूर, देवळाली प्रवरा, ता. राहुरी), सिध्दार्थ अशोक पठारे ( रा. झोडेगांव, ता. गंगापूर, जि. औरंगाबाद), एक विधीसंघर्षित बालक आदि आहेत.

Post a Comment

0 Comments