Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मारहाण करुन बळजबरीने कार व रोख रक्कम पळवून नेणारे सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद ; कोतवाली पोलीसांकडून २४ तासात कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 

अहमदनगर - मारहाण करुन बळजबरीने कार व रोख रक्कम पळवून नेणारे सराईत गुन्हेगारांची टोळी केडगाव येथे 24 तासाच्या आत मुद्देमालासह पकडण्याची धडकेबाज कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे. गौरव राजेंद्र शेवाळे (वय २२ रा. दुधसागर सोसायटी केडगांव अनगर),   शरद चंदु पवार (वय २२ रा. मतकरमळाजवळ दुबे यांचे खोलीत, देवीरोड केडगाव अनगर),  राहुल रामचंद्र बोरुडे (वय २५ रा. मोहिनीनगर केडगांव, अहमदनगर) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील,  अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी  विशाल ढुमे  यांचे मार्गदर्शनाखाली कोतवाली पो नि राकेश मानगांवकर यांनी दिलेल्या सूचनेनुसार  डिबीचे पोसई मनोज कचरे, पोसई मनोज महाजन, पोहेकॉ दिपक साबळे, पोना योगेश भिंगारदिवे, पांना गणेश धोत्रे, पोना नितीन शिंदे, पोना सागर पालवे, पोना नितीन गाडगे, पोना शाहीद शेख, पोना बंडु भागवत, पोकॉ सुजय हिवाळे, पोकों तान्हाजी पवार, पोकों सुमित गवळी, पोकों कैलास शिरसाठ, पोकॉ प्रमोद लहारे, पोका सोमनाथ राऊत, पोकॉ सुशील बाघेला, पोकों भारत इंगळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.  
दि. २१ जुलै २०२१ रोजी पहाटे २.३० वाचे सुमारास  हुडाई कंपनीचे असॅट कार (एमएच १४ एफ सी ३९५४) ही मध्ये पुणे येथून भाडे घेऊन अहमदनगर शहरात आले असता,  त्यांनी गाडीतील प्रवासी यांना अहमदनगर येथे सोडले. यानंतर  पुन्हा पुणे येथे जात असतांना अहमदनगर शहरातील नगर- पुणे रोडवरील कायनेटीक चौकात रोडच्या कडेला त्यांची कार उभी करुन बाजूस विश्रांती करत असतांना तीन अनोळखी इसम वय अंदाजे २४ ते २५ वर्षे हे त्यांचेकडील सुझुकी अॅक्सेस मोपेड मोटार सायकलवर येऊन त्यांनी कारचा दरवाजा वाजवून तू कार येथे का उभी केली, येथे पार्कीग नाही, असे म्हणून लाथाबुक्यांनी मारहाण केली व खिशातील ४ हजार रु रोख रक्कम व २ लाख रु किंमतीची हुंदाई कंपनीची अॅसेंट कार ( एमएच १४ एफ सी ३९५४) ही बळजबरीने घेऊन गेले आहे,या  सचिन बालाजी लेंडयं (वय-२४ वर्षे धंदा चालक रा. चक्रपाणी वसाहत. दुर्गामाता कॉलनी भोसरी जि पुणे) यांच्या फिर्यादीवरून  कोतवाली पोस्टे गुरंन । ५१५/२०२१ भादंवि कलम ३९४.३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दाखल गुन्ह्याची तात्काळ दखल घेऊन सदर आरोपींची माहिती मिळताच, 24 तासाच्या आत आरोपींना पकडण्यात कोतवाली पोलिसांना यश आले आहे.

Post a Comment

0 Comments