Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

प्रेम प्रकरणातून गोळीबार ; आरोपी १२ तासात जेरबंद

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
श्रीरामपूर - येथील दुर्गानगर सुतगिरणीजवळ प्रेम प्रकरणातून गोळीबार झाल्याची घटना घडली. घटना घडल्यानंतर अवघ्या १२ तासात आरोपींना पकडण्यात श्रीरामपूर पोलिसांना यश आले आहे. शुभम राजकुमार यादव (वय १८  रा. स्मशानभूमीजवळ वार्ड नं.६ श्रीरामपूर),  मुयर दिपक तावर (वय १८  रा. अल्फा हॉस्पिटलमागे वार्ड नं. ३ श्रीरामपूर) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
 जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील,   श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके  यांचे मार्गदर्शनाखाली श्रीरामपूरचे पो.नि संजय सानप, सपोनि संभाजी पाटील, पोउपनि दत्तात्रय उजे, पोना बिरप्पा करमल, पोकॉ किशोर जाधव,  पोकॉ राहुल नरवडे, पोकॉ पंकज गोसावी, पोकॉ रघुनाथ कारखेले आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की,दि. २६ जुलै २०२१ रोजी रात्री १०.४५ वाजण्याचे सुमारास दुर्गानगर सुतगिरणी श्रीरामपूर येथे शुभम राजू जवळकर (वय २३, रा.दुर्गानगर, सुतगिरणी, श्रीरामपूर) यास आरोपी शुभम यादव (रा.स्मशानभुमीजवळ श्रीरामपूर) याने त्याचे साथीदारासह लाल काळ्या रंगाचे पल्सरवर येवून जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने पिस्टलने गोळी मारली होती. सदर गोळीबारात शुभम राजु जवळकर यास छातीवर गोलाकार जखम झाली. त्यामुळे पोलीस ठाण्यात श्रीरामपूर शहर येथे गु.र.नं.५०५/२०२१ भादवि कलम ३०७, भा.ह.का.क.३/२५ प्रमाणे गुन्हा झालेला होता. शुभम राजू जवळकर याचे एक मुली बरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सदर मुलीसोबत आरोपी शुभम यादव याचे प्रेम प्रकरण चालू होते. त्यामुळे सदर मुलीवरुन दोघामध्ये यापूर्वी वाद झालेले होते.
सदर गुन्हा घडल्यानंतर पो. नि. संजय सानप हे पोलिस पथकासह तातडीने  घटनास्थळी जावून गोपनिय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी शुभम राजकुमार यादव (वय १८  रा. स्मशानभूमीजवळ वार्ड नं.६ श्रीरामपूर),  मुयर दिपक तावर (वय १८  रा. अल्फा हॉस्पिटलमागे वार्ड नं. ३ श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली. गुन्हयात वापरलेली पल्सर मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि दत्तात्रय उजे हे करित आहेत.


Post a Comment

0 Comments