Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

हातगाव दरोड्यातील फरार आरोपी अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 अहमदनगर -  शेवगाव तालुक्यातील हातगाव दरोड्यातील गुन्ह्यातील आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. अमोल पैलवान काळे (वय 20 रा. चिखली ता. आष्टी जि. बीड) असे पकडण्यात आलेल्याचे नाव आहे.
या घटनेतील फरार आरोपी काळे बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि. अनिल कटके यांना मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकाॅ दत्तात्रेय हिंगडे, बबन मखरे, सुनील चव्हाण, पोना संदीप पवार, पोकाॅ सागर ससाणे, आकाश काळे, रोहित येमूल, मच्छिंद्र बर्डे, चापोहेकाॅ उमाकांत गावडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

दि. 18 जून 2019 ला रात्री प्रकाश दिलीप झंज व दिलीप रामराव झंज ही दोघे घरांमध्ये झोपेत असताना दरवाजाचा कडी-कोंयडा तोडून घरात प्रवेश केला. झोपलेल्या  दोघांना धारदार हत्याराने मारहाण करून घरातील सोने-चांदीचे दागिने व रोख रक्कम 2 लाख 42 हजार असा ऐवज चोरून नेला होता. या घटनेचा तपास सुरू असताना फरार आरोपी अमोल काळे हा चिखली (ता. आष्टी) येथे राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि  कटके यांना मिळाली होती.

Post a Comment

0 Comments