Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यात १० ठिकाणी अवैध धंद्यावर छापे : साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त ; एलसीबीची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर-  जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाईत विशेष राबवलेल्या  मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी विविध १० ठिकाणी छापे टाकून ३ लाख ५६, हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची धडकेबाज कारवाई केली आहे. या छाप्यामध्ये ११ जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत समजलेले माहिती अशी की, नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्या आदेशाने  जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाईची विशेष मोहीम ही  दि. २६ ते दि. २८ जुलै २०२१ चे दरम्यान १० ठिकाणी छापे टाकण्यात आले. या छाप्यामध्ये ३ लाख ५६ हजार ५०० रु. किं. चा मुद्देमाल गावठी हातभट्टीची तयार दारु, कच्चे रसायन, भट्टीची साधने, नवसागर जप्त केली. ११ आरोपीविरुध्द एमआयडीसी, नगर तालुका, कोतवाली, भिंगार कॅम्प, राहुरी व पारनेर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ही कारवाई केली आहे

Post a Comment

0 Comments