Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

औरंगाबाद जिल्ह्यातून चोरीची 'स्कॉर्पिओ' मिळवली, तिघे अटक ; तोफखाना पोलिसांची कामगिरी

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- घराशेजारी लावण्यात आलेली स्कॉर्पिओ गाडी ही सोलनापूर (ता.पैठण,जि.औरंगाबाद) येथून ताब्यात घेतली असून, चोरणा-या तिघा चोरट्यांना अटक करण्याची कामगिरी तोफखाना पोलिसांनी केली आहे. प्रणव बाळासाहेब जगदाळे (वय २० रा. भारत पंपामागे गरवारेचौक, एमआयडीसी अ.नगर),  कृष्णा अशोक सरोदे ( वय ३० रा. घोरपडे हॉस्पीटल शेजारी, दिल्लीगेट अहमदनगर), प्रसाद यशवंत बनकर (वय २२ रा. प्रतिमा कॉलनी, पाईपलाईन रोड, अहमदनगर) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत. 
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर शहर उपविभागिय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना ठाण्याच्या पो.नि ज्योती गडकरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार तोफखाना  डी बी पथकातील पो.उप निरीक्षक सुरज मेढे, शकील सय्यद, पोना अविनाश वाकचौरे, पोना वसीम पठाण, पोना अहमद ईनामदार, पोको शैलेश गोमसाळे, पोकाॅ सचिन जगताप, पोकॉ अनिकेत आंधळे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.३ जुलै २०२१ रोजी ताब्यातील वाहन स्कॉर्पिओ (क्र एमएच १६ एटी ४४९१) ही  घराशेजारी पार्क करून लावली होती. ती कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली, या काकासाहेब भिमाराव सरोदे (लेखानगर, पाईपलाईनरोड अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात येथे गुन्हा र.नं  ५४६/२०२१ भादवी ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
या दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना,  गुप्तबातमीदार यांना माहीती देवून तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे शिताफिने माहिती मिळावून एक संयशीत  निष्पन्न झाला. त्याला ताब्यात घेऊन त्याचेकडे दाखल गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस करता त्याने नाव प्रणव बाळासाहेब जगदाळे असे सांगितले. त्याला पोलिस खाक्या त्याने गुन्हा केल्याचे कबुली दिली. त्यांचेकडून गुन्हयातील स्कॉर्पिओ (क्र एमएच १६ एटी ४४९१) ही जप्त करण्यात आली. सदरचा गुन्हा करते वेळी  सोबत साथीदार कृष्णा अशोक सरोदे,  प्रसाद यशवंत बनकर असे असल्याचे त्याने सांगितले. या संबंधितांच्या घरी जाऊन शोध घेतला असता, ते मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनाही पोलिस खाक्या दाखविताच सदरचा गुन्हा हा आम्ही एकत्र मिळून केला असल्याची त्यांनीही कबुली दिली.


Post a Comment

0 Comments