Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बनावट खरेदीखताद्वारे जमीन व प्लॉट विक्री : चारजण अटक ; कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 अहमदनगर- तोतया एकजण उभा करून त्याचे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड तयार करून बनावट खरेदीखत नोंदवून  जमीन व प्लॉट विक्री करणारी सराईत टोळी अटक करण्याची महत्त्वपूर्ण कारवाई कोतवाली पोलिसांनी केली आहे. शेख नासिर शब्बीर, नाजिम कुरेशी ( रा.सबजेल चौक, अहमदनगर), सैफ सत्तार बागवान ( रा. सुभेदारगल्ली रामचंद्र खूट अहमदनगर),  सिद्धार्थ धनेश्वर सोलंकी (रा. वाघस्करगल्ली, वडारवाडी भिंगार अहमदनगर), राजेश रामू कनोजिया ( रा. माधवबाग, भिंगार अहमदनगर ), रोहित सिसवाल ( पूर्ण नाव नाही रा. भिंगार) आदींविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी चारजणांना अटक करण्यात आली आहे.


 याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील मदडगाव येथील सर्वे नंबर 182 मधील एक हेक्टर(100 आर) क्षेत्राचे मूळ मालक अमीर मोहम्मद गौस शेख यांच्याऐवजी सन 2012 मध्ये मुख्य आरोपी नाजिम मुस्ताक कुरेशी याने दि. 14 जुलै 2019 ला दाखल गुन्ह्यातील तोतया शेख नासिर शब्बीर यास खरेदी लिहून घेणारा म्हणून उभा केला. खरेदी देणारा म्हणून मूळ मालक व त्याचा मुलगा यांच्याजागी तोतया एकजण उभा करून खरेदीखत दस्त क्रमांक 3294/2018 नोंदवून जमीन मूळ मालक अमीर मोहम्मद गौस शेख यांची फसवणूक केली होती. त्याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गु.र नं 545/ 2018 भादवी कलम 419, 420, 465, 467, 470, 471, 34 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. हा गुन्हा न्यायालयात न्यायप्रविष्ट असताना पुन्हा दि. 25 जून 2019 ला मुख्य आरोपी नाजिम कुरेशी याने यातील आरोपी शेख नासिर शब्बीर (तोतया, बनावट पत्ता खर्डा गावठाण, ता.जामखेड जि. अहमदनगर),सफौ सत्तार बागवान, सिद्धार्थ धनेश्वर सोलंकी, राजेश रामू कनोजिया, रोहित सिसवाल ( पूर्ण नाव नाही) यांच्याबरोबर संगनमत करून पुन्हा जमीनची बनावट खरेदीखत दस्त क्रमांक 3532 / 2021 अन्वये नोंदवून पुन्हा पूर्वीच्या गुन्ह्यातील तोतया आरोपी या गुन्ह्यातील आरोपी शेख नसीर शेख याला उभा करून त्याचे बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड याचा वापर करून जमीन ही फिर्यादी शशिकांत तबाजी आठरे यांना विक्री करून 11 लाख 85 हजार रुपये रक्कम व 5 लाख 15 हजार रुपये रकमेचा चेकने अशी एकूण 17 लाख रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी शशिकांत आठरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात सहाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, नगर  शहर पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याचे पो.नि. राकेश मानगांवकर, पोउपनि सतीश शिरसाठ, पोकॉ बापूसाहेब गोरे, योगेश कवाष्टे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments