Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गुजरातचा राष्ट्रीय वर्ल्ड पीएचडी चक्र पुरस्कार सुधीर मेहता यांना जाहीर

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर  : १९७२ पासून पत्रकारीता आणि देशातील अनेक संस्थामार्फत सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले राष्ट्रीय पत्रकार महासंघाचे महासचिव, युवक बिरादरी (भारत)चे माजी संचालक आणि नगर महोत्सवासह विविध संस्थाचेप्रमुख असलेल्या सुधीर मेहता यांना गुजरातमधील प्रतिष्ठित वर्ल्ड पीएचडी चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. गुजरातमधील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. विमल राठी यांनी या पुरस्काराची घोषणा करुन सुधीर मेहता यांचा बहुमान करतानाच मिशन वर्ल्ड पीएचडीचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड जाहीर केली आहे.
रविवारी ८ ऑगस्ट रोजी मेंटल हेल्थ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले असून तिरंगा शपथ आणि पुरस्कार ऑनलाईन दिले जाणार असल्याचे डॉ. विमल राठी यांनी सांगितले. मिशन आॅक्सिजन अंतर्गत वृक्षदान वृक्षारोपण, मिशन स्माइल अंतर्गत योगा मिशन, स्वछता, गरीबाना फुड पॅकेट वाटप, मिशन डास निर्मुलन, त्यासाठी जाळी वाटप, मिशन महिला बालजागृती शिबिर, मिशन तंबाखु निर्मुलन आणि मिशन आपत्ती निवारण अंतर्गत वर्कशॉप, अशा ८ राष्ट्रीय समस्यांबाबत राठी आणि अलका सांखला या तिरंगा शपथ सर्वांना देणार आहेत. या आठपैकी एका विषयावर सर्वानी मनापासून काम करावे आणि कोणीही, कोठेही यात काम करु शकणार आहेत, असे राठी यांनी म्हटले आहे.
सुधीर मेहता हे १९७२ पासून पत्रकारिता आणि  सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. अण्णा हजारे यांचे भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन ज्यातून उभे राहिले, ते सुधीर मेहता यांनी उघडकीस आणलेल्या सामाजिक वनीकरण विभागातील कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचार प्रकरणातूनच. तीन वर्ष सुधीर मेहता यांनी एकाकी लढा दिला. पुरावे गोळा केले. धमक्या आल्या, प्रचंड दबाव आला, मात्र माघार घेतली नाही. प्रकरण अण्णासाहेब हजारेंकडे सुपुर्द करुन सर्व १७ अधिकारी निलंबीत होइपर्यंत अण्णासाहेबांसमवेत या प्रकरणाचा पाठपुरावा जिद्दिने केला.
आज ते राष्ट्रीय पत्रकार महासंघ नवी दिल्लीचे महासचिव आहेत. महासंघाचे महाराष्ट्र अध्यक्ष पद त्यांनी भुषवले आहे. अ. भा. मराठी पत्रकार परिषद मुंबईचे कोषाध्यक्ष म्हणून मोठी संधी त्यांना मिळाली. इंडियन फेडरेशन ऑफ स्मॉल मिडीयम न्यूज पेपर्स न्यू दिल्ली या संघटनेचे सेक्रेटरी म्हणून त्यांनी काम पाहिले. नगर जिल्हा पत्रकार संघ, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. त्यांच्या कारकिर्दीत मराठी पत्रकार परिषदेचे हीरक महोत्सवी सम्मेलन नगरला झाले. ७०० पत्रकार सहभागी झाले. एक दिवस महिला पत्रकारांचे सम्मेलन प्रथमच झाले. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, केंद्रीयमंत्री बाळासाहेब विखे पाटील, सुमित्रा महाजन, सभापती ना. स. फरांदे बाळासाहेब भारदे, ना.रामकृष्ण मोरे, गोविंदराव आदिक, दिलिप वळसे पाटील, ना. बाळासाहेब थोरात अवघे मंत्रीमंडळ अधिवेशनास उपस्थीत होते. महाराष्ट्रासाठी प्रेस कौन्सिल, पत्रकाराना अचारसंहिता आणि पत्रकारांचे विविध प्रश्न मार्गी लावता आले.
युवक बिरादरी (भारत)चे पदाधिकारी म्हणून काम करताना ३०० कार्यकर्ते घेउन नगरहुन दिल्ली भारत मिलन यात्रा, पुणे ते दिल्ली यात्रा, गोवा ते दिल्ली वसुंधरा बचाव यात्रा, वर्धा सेवाग्राम ते नवसारी दांडी स्मृती यात्रा, कोपरगाव ते कोल्हापूर पर्यावरण यात्रा, देशभर तरुणांमधे पर्यावरण, ग्लोबल वार्मिंग, लोकसंख्या आणि सर्व राष्ट्रीय समस्यांवर यात्रा, सायकल यात्रा, सर्व राज्यात निवासी युवा नेतृत्व शिबिरातुन राष्ट्रीय समस्यांवर उपक्रम आयोजित केले.
२० वर्षे नगरचा भव्य नगर फेस्टिव्हल, शेकडो सांस्कृतिक प्रकारचे कार्यक्रम, महिला महोत्सव, बाल महोत्सव विविध स्पर्धा, २०० पेक्षा जास्त नेत्र शिबिर, सर्व वैद्यकिय शिबिरे, मान्यवर विचारवंतांच्या व्याख्यानमालांचे आयोजन, २५ वर्षात युवक महिला, अंध अपंगांसाठी नोकरी रोजगार मार्गदर्शन आदींचे योगदान पाहुन मेहता यांना हा पुरस्कार देण्यात आला. या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल अनेक मान्यवरांनी सुधीर मेहता यांचे अभिनंदन केले आहे.

Post a Comment

0 Comments