Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

उन्नती सेवाभावी संस्थेचे ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा वाचनालय लोकार्पण सोहळा

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
भिंगार -- सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या उन्नती सेवाभावी संस्थेच्या ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा अद्यावत वाचनालयाचा लोकार्पण सोहळा नुकताच पार पडला.
भिंगार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पोपटराव नगरे यांच्या अध्यक्षतेखाली व समाजसेविका सौ.सिमाताई बेलेकर यांच्या शुभहस्ते हा लोकार्पण सोहळा झाला.याप्रसंगी माजी सनदी अधिकारी विठ्ठलराव लोखंडे,हभप अमित महाराज धाडगे,अभियंता मळुराज औटी, अरूण दळवी, सागर वराडे, बाळासाहेब दिवटे,सुभाष हौगडेसर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होते.
   या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना औटी यांनी परिसरात स्पर्धा परीक्षा वाचनाची गरज अधोरेखित केली.तर ह.भ.प.धाडगेमहाराज यांनी या वाचनालयास समाजातील प्रत्येक सजग नागरिकांनी अनाठायी खर्च टाळून समाजातील गरजवंत आणि विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या उन्नती संस्थेला मदत करण्याचे अवाहन केले.माजी सनदी अधिकारी लोखंडे यांनी परिसरातील गुणवंत विद्यार्थ्यांना उन्नती संस्थेच्या माध्यमातून चांगली सोय झाली असुन हे ग्रंथालय व वाचनालयास आवश्यक ती मदत करण्याचे आवाहन केले. 
बाळासाहेब दिवटे यांनी उपस्थितांना समाजसेवेच्या माध्यमातून आध्यात्मिकता कशी जोपासता येवु शकते याची माहिती देवून या संस्थेला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. 
 संस्थेचे उपाध्यक्ष दत्ता लोखंडे यांनी उन्नती सेवाभावी संस्थेने मागील तीन वर्षात केलेल्या कामाची माहिती दिली. त्याच बरोबर ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा वाचनालयाची संकल्पना विषद केली.हरीभाऊ लोखंडे यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परिक्षेसाठी डिजीटल पुस्तकांपेक्षा  प्रत्यक्ष पुस्तक वाचनावर भर द्यावा असे सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतामध्ये नगरेसर यांनी समाजात वाचन संस्कृती जोपासावी असे सांगून गरीब वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी लागणारे पुस्तके उपलब्ध करून दिल्याबद्दल उन्नती संस्थेस धन्यवाद दिले.उन्नती संस्थेच्या या उपक्रमासाठी वाचनप्रेमिंनी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन केले. 
संस्थेचे अध्यक्ष दिलीप आस्मर यांनी उपस्थितांचे स्वागत करून आभार व्यक्त केले.तसेच संस्थेला पुढील कामाकरिता समाजातील समविचारी व समाजमन असलेल्या लोकांच्या मदतीची गरज आहे असे सांंगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल गिरी यांनी केले.तसेच या कार्यक्रमामध्ये संस्थेचे संचालक गणेश उपरे, अँड. राजाभाऊ शिर्के,शाम थोरात,अनिल सोळसे,अच्युत चिनके,गजानन भंडारे,पराग खूपसे,सिमा केदारे, शिवम भंडारी आणि सचिव सागर कांबळे हे उपस्थित होते. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संगिता वरुडे,दिपक धकाते, राजू नागपुरे, सिद्धांत भंडारे श्रीमती महादर आणि राणी लोखंडे यांनी मेहनत घेतली.
संकलन : सुधीर कुलट

Post a Comment

0 Comments