Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चिंचपूर पांगुळला परिसरात ढगफुटी परिस्थिती!

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी- तालुक्यातील चिंचपुर पांगुळ परिसरात रविवार (दि.११) अचानक ढगफुटी सदृश्य पाऊस दुपारी १२ वाजता झाला.
 जोगेवाडी ,हातोला ,चिंचपुर पांगुळ तसेच वडगाव येथील नदी ,ओढे खळखळून वाहण्यास सुरवात झाली आहे, यावर्षी जून महिन्यात अगदी वेळेवर सुरवात केलेल्या पावसामुळे शेतकऱयांनी  पेरण्या सुद्धा वेळेवर केल्या होत्या मात्र  परिसराकडे पावसाने तब्बल एक महिना  पाठ फिरवली होती यामुळे बहारदार आलेले पीक हातचे जाते की काय या विवंचनेत शेतकरी वर्ग होता परंतु असे असताना उशिरा का होईना  आज रोजी अतिशय दमदार पावसाने हजेरी लावली. नदी ,नाले,बंधारे तुडूंब भरून वाहू लागले आहेत. यामुळे परिसरातील सर्व शेतकरी वर्ग आनंदून गेले आहेत.

@ सोमराज बडे पत्रकार-९३७२२९५७५७

Post a Comment

0 Comments