Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

... तहसिल कार्यालयातील अधिका-यास विधवा महिलेने चप्पलने मारले !


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
चिकोडी - तहसीलदार  ग्रेड २ जमादाराकडे एक विधवा महिला पेंशन मागण्यासाठी गेली. या दरम्यान त्या महाशय तहसीलदाराने चक्क पॅन्ट काढून गुप्तांग दाखवत अश्लील हातवारे करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे  संतप्त झालेल्या त्या विधवा महिलेने त्या महाशय तहसीलदारावर चप्पलचा भडीमार केल्याची घटना घडल्याचे नुकतीच समोर आली आहे. ही धक्कादायक घटना बेळगावच्या चिकोडी शहरात घडली आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी की,  बेळगावच्या चिकोडी शहरातील एका विधवा महिलेचे पती हे काही दिवसांपूर्वी कोरोना आजारामुळे मयत झाले. त्या दुर्दैवी महिलेस एक मुलगा असून, मयत पतीच्या पेंशनच्या कामासाठी तिचा मुलगा दोन आठवड्यांपासून तहसीलदार कार्यालयात येत होता. पंरतु तहसिल कार्यालयातील  अधिकाऱ्यांनी तुझ्या आईला घेऊन ये, असे सांगितले. यामुळे  दुसऱ्या दिवशी मुलगा आईसह तहसीलदार कार्यालयामध्ये आला. त्यानंतर तिथल्या ग्रेड २ जमादाराने मुलाला बाहेर उभे राहण्यास सांगितले.  मुलगा बाहेर जाताच विधवा महिलेसमोर पॅन्ट काढून गुप्तांग दाखवत अश्लील भाष्य सुरु केले. त्या जमादाराचे असे विकृत वागणे पाहून महिला कार्यालयाच्या बाहेर आली आणि बाहेर उभ्या असलेल्या मुलाला सर्व प्रकार सांगितला. संतप्त झालेल्या आई व मुलाने त्या ग्रेड २ जामादाराला चपलेचा चांगलाच चप्पलाने चोप दिला. या प्रकारानंतर तहसीलदार कार्यालयाबाहेर मोठी गर्दी जमा झाली. आई आणि मुलाने सदर घटनेची पोलिसांत तक्रार करुन संबंधित जमादारावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलेच्या तक्रारीनंतर चिकोडीच्या तहसीलदारांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आश्वासन देऊन प्रकरण निवळले. मिळालेल्या महितीसमोर या जमादारावर याआधीही देखील गुप्तांग दाखवल्याचे अनेक आरोप आहेत. त्यामुळे अनेक सामाजिक संघटनांनी त्या जमादाराची चौकशी करुन कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे. 


Post a Comment

0 Comments