Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जनमोर्चा महिला शहराध्यक्षपदी अनुरिता झगडे

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - पुर्वाश्रमीच्या पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्या अनुरिता झगडे यांची ओबीसी, व्हीजेएनटी जनमोर्चाच्या नगर शहर महिला आघाडीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. 


जनमोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब सानप यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. जनमोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, दक्षिण जिल्हाध्यक्ष सुनिल भिंगारे, डॉ.सुदर्शन गोरे आदि यावेळी उपस्थित होते.
आपण शहरात श्री.भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे संघटन उभं करणार असून, संघटीत आणि असंघटीत महिलांचे प्रश्न या पदाच्या माध्यमातून मांडून ते सोडविण्याचा प्रयत्न करु, असे झगडे यांनी नियुक्त पत्र स्वीकारतांना सांगितले. 
त्या जनआधार सामाजिक संघटनेच्या तसेच मानव अधिकार फौंडेशन आणि बारा बलुतेदार महासंघाच्या अध्यक्षा म्हणून सध्या कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे एकत्वम फौंडेशनच्या संस्थापिका असून, श्री रामकृष्ण एज्युकेशन सोसायटीच्या विद्यालयात त्या शिक्षिका असून, समाजाला सुसंस्कृत करण्याचा आणि पुरोगामी विचाराची शिदोरी त्या या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करतात.
या नियुक्तीबद्दल त्यांचे बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड, उपाध्यक्ष अनिल इवळे, शहराध्यक्ष शामभाऊ औटी, युवा अध्यक्ष आर्यन गिरमे, ओबीसी, व्हीजेएनटीच्या जिल्हाध्यक्षा सुषमा पडोळे, नाभिक महामंडळाच्या महिला जिल्हाध्यक्ष वनिता बिडवे, शहराध्यक्ष सौ.पवळे, छाया नवले, सौ.मनिषा गुरव आदिंनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments