Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रात्री दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणारे आरोपी जेरबंद ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- रात्रीच्या वेळी  दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणा-यांना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.  शुभम संजय सोमासे (वय २१ रा. भेंडा फॅक्टरी, ता. नेवासा), अक्षय कल्याण जाधव (वय २३, रा. देवगांव रोड, कुकाणा, ता. नेवासा ) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांच्या सूचनेनुसार  पथकातील पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ दत्तात्रय गव्हाणे, पोना सुरेश माळी, विशाल दळवी, शंकर चौधरी, दिपक शिंदे, रवि सोनटक्क्के, पोकॉ जालिंदर माने, विनोद मासाळकर, चापोना चंद्रकांत कुसळकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 

याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.२ जुलैला राञी मोटार सायकलवरुन कोरडगांव येथे जात असताना रात्री ९ वा. चे सुमारास फुंदे टाकळी फाट्याचे पुढे आले असता, पाठीमागून एका मोटार सायकलवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी मोटारसायकल अडवून शिवीगाळ, दमदाटी करुन व चाकूचा धाक दाखवून फिर्यादीचा मोबाईल, कॅमेरा, कॅमेऱ्याची लेन्स, फ्लॅश, मेमरी कार्ड, पेनड्राईव्ह असा एकूण ३८ हजार  रु. किं. चा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता. या घटनेबाबत योगश बद्रीनाथ मगर ( फोटोग्राफी, रा. कोरडगाव, ता. पाथर्डी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात गुरनं. ४७९/२०२१ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास चालू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांना हा गुन्हा केलेल्या आरोपींची माहिती मिळताच, श्री कटके यांनी पोलीस पथकाला सूचना दिल्या. पथकाने भेंडा (ता.नेवासा) येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेतली. आरोपीचा शोध घेवून आरोपी  शुभम संजय सोमासे याला ताब्यात घेतले. त्याचेकडे  गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता, त्याने सदरचा गुन्हा हा त्याचा साथीदार अक्षय जाधव (रा. कुकाणा) असे दोघांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. सदर माहितीचे आधारे आरोपीचा शोध घेवून आरोपी अक्षय कल्याण जाधव याला कुकाणा येथून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देवू लागले. त्याना विश्वसात घेऊन कसून चौकशी केली असता,  त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. गुन्ह्यातील चोरलेल्या मुद्देमालापैकी ६ हजार रुपयांचा मोबाईल, २० हजार  रु. चा निकॉन कं. चा कॅमेरा, २ हजार रु. किं. चा डिजेटेक कं. चा फ्लॅश, १ हजार  रु. किं. चा सॅन्डीक्स कं. चा पेनड्राईव्ह तसेच गुन्हा करते वेळी वापरलेली ४० हजार रु. किं. चा होंडा शाईन मो.सा.नं. (एमएच १७ बीजे ३४५२) असा एकूण ६९ हजार रु. किं चा मुद्देमाल काढून दिल्याने तो जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पो.स्टे. येथे हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही पाथर्डी पो.स्टे. करीत आहेत. 
 यापूर्वी आरोपीविरुध्द म जबरी चोरी, बेकायदेशिररित्या अग्निशस्त्र जवळ बाळगणे, मारामारी यासारखे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
👉आरोपी शुभम संजय सोमासे याचे विरुध्द नेवासा पो.स्टे. गुरनं. ७१७/२०१८ भादवि कलम ३९४, २०१ तर आरोपी अक्षय कल्याण जाधव याचे विरुध्द  भिंगार कॅम्प,  नेवासा पोलीस ठाण्यात ६०/ २०१७, आर्म अॅक्ट कलम ३/२५, ७ ७३७/२०१८ भादवि कलम ३२६, ३२४ दाखल गुन्हे आहेत.
  

Post a Comment

0 Comments