Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

४ लाखाचा गुटखा पकडला ; श्रीगोंदा पोलिसांची कारवाई


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 श्रीगोंदा - तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथे 4 लाख 15 हजार 209 रुपयांचा हिरा पानमसाला,  सुगंधी तंबाखू, गुटखा जप्त करण्याची कारवाई श्रीगोंदा पोलिसांनी केली.
 श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पो. नि. रामराव ढिकले यांच्या सूचनेनुसार पोसई रणजित गट  पोकाॅ प्रकाश मांडगे,  किरण बोराडे,  गोकुळ इंगवले, अमोल आजबे, अमोल कोतकर, महादेव काळे, मपोकाॅ लता पुराने आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

पो. नि. रामराव ढिकले यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी पोलिस पथकाला सूचना दिल्या. त्यानुसार पोलिस पथकाने लोणी व्यंकनाथ गावात जाऊन प्रवीण संतोष गायकवाड यांच्या मालकीचे सार्थक किराणा स्टोअर्सचे समोरील किराणा मालाचे गोडाऊन व दुकानासमोरील 407 टेम्पोवर छापा टाकून 4 लाख 15 हजार 209 रुपये किंमतीचा मुद्देमाल यात ३ लाख रुपयांचा 407 टेंम्पो व १ लाख १५ हजार 280 रुपयाचा हिरापान मसाला, सुगंधी तंबाखू साठा जप्त करण्यात आला.  गायकवाड याच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलीस ठाण्यात अन्नसुरक्षा व मानके कायदा 2007 नियम व नियमन २०११ चे कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोसई रणजित गट व पो.कॉ किरण भापकर हे करीत आहे.


Post a Comment

0 Comments