Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पंढरपुरात येण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे स्वतःच गाडी चालवताना... ; शासकीय पूजेसाठी हजर

 

👉यावर्षीचा मान वर्धा जिल्ह्यातील केशव शिवदास कोलते, इंदुबाई केशव कोलते यांना मिळाला
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर

मुंबई -आषाढी एकादशीनिमित्त पाडुरंगाच्या पूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः पंढरपूरला हजर राहणार आहेत. ते  कुटुंबासोबत पंढरपूरकडे रवाना झाले असून, त्यांनी स्वतःच गाडी चालवली आहे.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंढरपूरला दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे हे देखील उपस्थित राहतील. त्यानंतर मध्यरात्री अडीच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते महापूजा पार पडणार आहे.

आषाढी एकादशीनिमित्त दरवर्षी महाराष्ट्रातील एका कुटुबियांना पुजेचा मान मिळत असतो. यावर्षीचा मान वर्धा जिल्ह्यातील केशव शिवदास कोलते आणि इंदुबाई केशव कोलते यांना मिळाला आहे. ते यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुजाअर्चा करतील. आम्हाला महापुजेचा मान मिळाला आहे त्यामुळे आमच्या कष्टाचं फळ झालं असे कोलते म्हणाले.


Post a Comment

0 Comments