Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

रात्री दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणारे पकडले ; एलसीबीची कारवाई

  
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- अहमदनगर शहरात राञी दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणारे चोरटे पकडण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक  सौरभकुमार अग्रवाल व नगर  उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांच्या  मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे, पोना सुनिल चव्हाण, संदीप पवार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.१५ मे २०२१ रोजी रात्रीचे वेळी  मोटार सायकलवरुन अहमदनगर येथून केडगाव येथे जात असताना रात्री ९.३० वा. चे सुमारास केडगाव इंडस्ट्रीयल एरिया येथील बोथरा कंपनीसमोर आले असताना पाठीमागून सफेद रंगाचे मोपेड गाडीवरुन आलेल्या दोन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांना अडवून फिर्यादीचा ७,०००/-रु. किं. चां विवो कंपणीचा मोबाईल बळजबरीने चोरुन नेला, या बाबासाहेब रामभाऊ मिसाळ (रा. शिवाजीनगर, केडगांव, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात येथे गुरनं. ३४७/२०२१ भादवि कलम ३९२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दाखल गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हा समांतर तपास करीत असताना पोनि अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा प्रतिक साळवे (रा. शिवाजीनगर, केडगांव) याने व त्याचे साथीदाराने मिळून केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. श्री कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला सूचना दिल्या. पथकाने  मिळालेल्या महितीचे आधारे आरोपीचा शिवाजीनगर, केडगाव येथे जावून शोध घेवून आरोपी  प्रतिक संदीप साळवे (वय- २०, रा. शिवाजीनगर, मराठी शाळेजवळ, केडगांव, अहमदनगर) यास ताब्यात घेतले. त्याचेकडे  गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा हा त्याचा साथीदार अबूजर राजे (रा. लालानगर, केडगाव) असे दोघांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. सदर माहितीचे आधारे आरोपीचा शोध घेऊन आरोपी  अबूजर लतीफ राजे (वय २४ रा. लालानगर, पाण्याचे टाकीजवळ, केडगाव, अ.नगर) यास लालानगर, केडगांव येथून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपीकडे गुन्ह्यातील चोरलेल्या मोबाईलबाबत व गुन्ह्याचे वेळी वापरलेल्या मोपेडगाडी बाबत विचारपूस केली असता, आरोपींनी गुन्ह्यातील चोरलेला ७ हजार  रु. किं. चा विवो कंपनीचा निळे रंगाचा, तसेच गुन्ह्याचे वेळी वापरलेले १५ हजार रु. किं. ची होंडा अॅव्हेटर मोपेड गाडी (एमएच १६ सीजे ६०८३) असा एकूण २२ हजार रु. किं. चा मुद्देमाल समक्ष हजर केल्याने तो जप्त करुन आरोपींना मुद्देमालासह कोतवाली पोलिस ठाण्यात  हजर करण्यात आले. पुढील तपास कोतवाली पोलिस करीत आहेत.Post a Comment

0 Comments