Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सीबीआय कार्यालयात भीषण आग


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
नवीदिल्ली- दिल्लीतील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) कार्यालयात गुरुवारी (दि.8) भीषण आग लागल्याचे समोर आले आहे. माहितीनुसार, ही आग वाहनतळ परिसरातील  इलेक्ट्रॉनिक खोलीत लागली होती . घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ५ गाड्या दाखल झाल्या होत्या.
सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार,  आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे. या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही आहे. 
वाहन परिसरातून धूर आल्यानंतर लगेचच अधिकारी कार्यालयातून बाहेर पडले. एका माध्यमाच्या वृत्तानुसार, सकाळी ११.३५ सुमारास सीबीआय कार्यालयातून आपात्कालीन कॉल केला गेला.
याबाबत सीबीआय अधिकाऱ्यांनी माहिती दिली की, ‘सीबीआय कार्यालयातील जेनरेटरमध्ये शॉर्ट सर्किट झाल्यामुळे धूर पसरला होता. कोणतेही नुकसान झाले नाही आहे. धूर पसरताच ऑटोमॅटिक स्प्रिक्लर सिस्टम अॅक्टिवेट झाला. काही वेळात स्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईल.


Post a Comment

0 Comments