Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

निमगाव डाकूचे ग्रामसेवक माने यांना मारहाण ; आरोपीस अटक

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत : तालुक्यातील निमगाव डाकु येथील ग्रामसेवक एम.एस. माने यांना संजय मद्रास काळे यांने दारुच्या नशेत कार्यालयात घुसून मारहाण केली. काळे याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला कर्जत पोलिसांनी अटक केली.  
याबाबत समजलेले माहिती अशी की, ग्रामसेवक माने यांनी कर्जत पोलीस ठाण्यात  दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,  गुरुवार दि. 15 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालय निमगाव डाकु येथे मी माझ्या कार्यालयात काम करत असताना संजय मद्रास काळे ( रा. निमगाव डाकु ता. कर्जत) हा ग्रामपंचायत कार्यालयात आला. मला म्हणाला की, माझ्या आईच्या नावावरील आमचे घराचा मला उतारा काढुन द्या, असे म्हणाल्यानंतर मी त्यास म्हणालो की, तुमचे 8 अ चे रजिस्टरला नाव पाहुन तुमचा उतारा काढून देतो. असे म्हणालो असता त्याने मला शिवीगाळ दमदाटी करून गचांटीला धरुन शर्ट फाडून मला लाथाबुक्क्याने मारहाण केली. माझ्या समोरील रजिस्टर फेकून देऊन कार्यालयीन खुर्च्याची मोडतोड केली आहे. माझे सरकारी काम करत असताना माझ्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. म्हणून माझी त्याचेविरुध्द फिर्याद आहे. संजय काळे हा मारहाण करत असताना यावेळी ग्रामस्थ मध्यस्थी करण्यासाठी आले असता, त्यांना  देखील आरोपीने अपशब्द वापरून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. दहशतीचे वातावरण तयार केले.  याप्रकरणी ग्रामसेवक एम.एस. माने यांनी कर्जत पोलीस ठाण्यात  गुन्हा केला.  यावेळी विस्तार अधिकारी राजा अटकोरे, ग्रामसेवक सेवक संघटनेचे अध्यक्ष अमृत काळदाते, तात्यासाहेब ढोबे, दत्तात्रय मेंगडे, प्रताप साबळे, श्याम भोसले, अमोल बरबडे,  सचिन काळदाते, देविदास राऊत, अमित कोल्हे, अनिल मते, आदी सह अनेक ग्रामसेवक उपस्थित होते. 
पो. नि. चंद्रशेखर यादव, सपोनि सुरेश माने व पोलिसांनी आरोपीना लगेच ताब्यात घेतले. भादवी कलम 353 323, 504, 506  दारूबंदी कलम कायदा 85 आदी कलमानव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोहे कॉ जालिंदर पाचपुते हे पुढील तपास करत आहेत.
संकलन : आशिष बोरा

Post a Comment

0 Comments