Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

बळजबरीने लाखो रुपयांची वसुली करणाऱ्या राशीनच्या दोन सावकारांवर गुन्हा दाखल ; कर्जत पोलीसांची कारवाई

 


👉वसुलीच्या त्रासाने गाव सोडायला भाग पडले सावकाराने
👉१० लाख ५० हजारांची मागणी करत मारून टाकण्याची धमकी
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत :   कर्जतचे उपक्रमशील पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सुरू केलेल्या अवैध सावकारकीच्या मोहिमेत बड्या- बड्यांचे धागेदोरे सापडत असून दिवसेंदिवस सैल होत असलेल्या सावकारकीच्या फासामुळे अनेक गोरगरीब कुटूंबांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. या धडक कारवायांमुळे सावकारकी क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

महिला तक्रारदार (रा.राशीन ता.कर्जत) यांनी कर्जत पोलिसात फिर्याद दिली की, तक्रारदार व तक्रारदाराचा मुलगा याने नाना उर्फ बजरंग दौलत काळे (रा.परीटवाडी ता.कर्जत) याच्याकडून २० मार्च २०१३ रोजी ५ लाख रुपये ५ रुपये टक्के व्याजदराने घेतले होते.त्यानंतर  तीन वेळा वेगवेगळ्या वर्षी असे एकूण ७ लाख १० हजार रुपये घेतले होते.या सर्व रकमेचे तब्बल २२ लाख रुपये व्याजापोटी दिले.एवढी रक्कम देऊनही अजुन १० लाख ५० हजार रकमेची मागणी सावकाराने केली. मात्र जवळ पैसेच नसल्याने फिर्यादीने पैसे देणे बंद केले मात्र सावकाराने फिर्यादीचा मुलगा याला मार्च २०१९ रोजी राशीन ग्रामपंचायत कार्यालयाकडून बसस्टँडकडे जात असताना अडवून शिवीगाळ व दमदाटी करत लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली होती. हा त्रास सहन न झाल्याने फिर्यादीचा मुलगा याने आपल्या राहत्या घरी येऊन अंगावर केरोसीन (रॉकेल) ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतरही व्याजाच्या पैशांचा तगादा कमी होत नसल्याने फिर्यादीचा मुलगा वर्षभर पुणे येथे भीतीपोटी निघून गेला होता. सावकार काळे हा फिर्यादीच्या घरी येऊन तुझा मुलगा कुठं गेला आहे?त्याचा मोबाईल नंबर सांग? असे म्हणत धक्काबुक्की व शिवीगाळ करत 'माझे व्याजाचे पैसे दिले नाही तर बघून घेईन.'असा वारंवार दम देत होता.त्यानंतर काळे हा एवढ्यावर थांबला नाही.त्याने फिर्यादीच्या घरासमोर येऊन मुलाला १० लाख ५० हजारांची मागणी करत मारून टाकण्याची धमकी दिली. 
  दरम्यान सन २०१५ साली फिर्यादीचा मुलगा  याने रमेश जानभरे (रा.जानभरेवस्ती,राशीन ता. कर्जत) याच्याकडुन २ लाख रुपये ५ रुपये व्याजदराने घेतले होते.मात्र रक्कम देताना जानभरे याने स्वाक्षरी केलेला युनियन बँकेचा कोरा धनादेश घेतला होता. त्यानंतर व्याजापोटी ३ लाख रुपये जानभरे याला दिले होते.मात्र जानभरे याने घरी येऊन 'तुझा मुलगा कुठे आहे? व्याजाचे पैसे कधी देणार? असे म्हणत शिवीगाळ व दमदाटी केली.व्याजाचे पैसे दिले नाही तर माझ्याजवळ असलेला कोरो धनादेश बँकेत भरून तुमच्यावर कायदेशीर कारवाई करेल. अशी धमकी दिली होती.सावकारकीचा कोणताही परवाना नसलेल्या सावकारांवर कर्जत पोलीस स्टेशन गु.र.न.४२७/२०२१ भा.द.वि.कलम३४१,४५२,३२३,५०४,५०६ व महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ कलम ३९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस हवालदार तुळशीदास सातपुते हे करत आहेत.

📥 साहेब,आम्ही तुमचे 
उपकार आजन्म विसरणार नाही!
 व्याजाच्या चक्रव्यूहात अडकलेल्या गोरगरीब कुटुंबांना आत्महत्येच्या विचारापासून परावृत्त होऊन पुन्हा नव्याने जगण्याची दिशा मिळत आहे. सावकारकीचा फास 'सैल' झालेली अनेक कुटुंबे यादव यांना भेटून त्यांचे आभार मानत आहेत.'साहेब, आम्ही तुमचे आजन्म उपकार विसरणार नाही असे भरल्या डोळ्यांनी दुवा देत आहेत.

Post a Comment

0 Comments