Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

आझाद मैदान दंगल खटला ; ॲड उमेशचंन्द्र यादव पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

  
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
मुंबई - येथील आझाद मैदान दंगल खटल्यात गुन्हे अन्वेषण विभागाने 80 आरोपींवर आरोपपत्र दाखल केले होते. या अनुषंगाने मुंबई सत्र न्यायालयात हा खटला सुरू आहे. या घटनेतील व्याप्ती व गांभीर्य पाहून गृहविभागाने सरकारी पक्षाच्यावतीने  बाजू मांडण्यासाठी  नुकतीच मुंबईतील ॲड उमेशचंद्र यादव पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली  आहे.


सन 2012 मध्ये आसाममध्ये विशिष्ट अल्पसंख्य समुदायाची संख्या वाढत चालली आहे. या कारणाकरिता आसाममधील बोडो संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. त्याची प्रतिक्रिया व निषेध नोंदवण्यासाठी मुंबईत रझा अकादमीने आझाद मैदानापर्यंत निषेध रॅली काढण्याचे आयोजन करण्यात आले होते. यादरम्यान केवळ 1500 आंदोलकांना परवानगी देण्यात आली होती. परंतु शुक्रवारचा दिवस असल्याने या ठिकाणी जवळपास 40 हजार नागरिक आझाद मैदानात एकत्र आली. यावेळी सदर जमावाने जाळपोळ केली. या घटनेत दोन व्यक्ती मयत होऊन अनेक लोक जखमी झाले होते. यात महिला पोलिस कर्मचाऱ्यांचा विनयभंग झाल्याच्या तक्रारी होत्या. या दरम्यान अनेक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. तत्कालीन प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सदर प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाकडे देण्यात आला होता. 
याप्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने 80 आरोपींवर आरोपपत्र दाखल केले होते. या अनुषंगाने मुंबई सत्र न्यायालयात हा खटला सुरू आहे. सदर प्रकरणाची व्याप्ती व गांभीर्य पाहून गृहविभागाने सरकारी पक्षाच्या बाजूने नुकतीच मुंबईतील ॲड उमेशचंद्र यादव पाटील यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे.

Post a Comment

0 Comments