Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

टायर व्यापा-यास फसवणुकीतील ४ लाख मिळाले ; कर्जत पोलिसांची कामगिरी

  
👉कर्जत पोलिसांनी मोठ्या कसोशीने प्रयत्न करून मिळवून दिली कर्जकराला रोख रक्कम.
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत फसवणूक टायर व्यापा-याला ४ लाख परत मिळवून देण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी कर्जत पोलिसांनी केली आहे.
 जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधिक्षक सौरभकुमार अग्रवाल, कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांचे मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाण्याचे पो.नि. चंद्रशेखर यादव , सपोनि सुरेश माने, पोकाॅ पांडुरंग भांडवलकर, श्याम जाधव, सुनिल खैरे, गोवर्धन कदम, सचिन वारे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.11 जानेवारी 2021 रोजी साई टायर्स नावाचे दुकान आहे. त्या दुकानात विक्री करण्यासाठी गणेश कांताराव पिंगळकर, (रा. तालेहॉल गल्ली, हिंगोली, ता. जि. हिंगोली) याने त्याचा मोबाईल क्रमांक 7888140243 वरून मोबाईलवर कॉल करून मी अधिकृत टायर विक्रेता असल्याचे सांगितले. त्याचा जीएसटी नंबर व त्याच्या दुकानाचा नंबर पाठवला. त्याचे बँक अकाउंटमध्ये टायर खरेदी करीता 12 लाख 87 हजार रुपये टाकून त्यापैकी 6 लाख 4 हजार 200 रुपयांचे टायर बिल न देता पाठवून दिले. उर्वरित रकमेचे टायर्स पाठवले नाहीत.  पाठवलेल्या जीएसटी नंबरची खात्री केली असता, सदर जीएसटी नंबर वैभव मारुती भोसले याचा असल्याची माहिती मिळाली, म्हणून त्याने त्याचे आर्थिक फायद्यासाठी अधिकृत विक्रेता असल्याची माहिती देऊन रक्कम घेऊन  विना बिलाचे टायर पाठवून उर्वरित रक्कम न देता सदरचा अपहार केल्याचा, या धनंजय लक्ष्‍मण दळवी (वय 35 टायर दुकान, रा.भांडेवाडी, ता. कर्जत, जि.अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता.
या दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना 
आरोपी गणेश कांतराव पिंगळकर (वय 30 ) यास दि. 1 जुलै 2021 रोजी हिंगोली येथून अटक करण्यात आली.  त्याच्याकडून 4 लाख रुपये जप्त करण्यात आले. तसेच त्याचा जोडीदार आरोपी  अमित सुभाष जाधव (रा. कोथरूड पुणे) यास दि. 12 फेब्रुवारी 2021 रोजी पुणे येथून अटक करण्यात आली होती.Post a Comment

0 Comments