Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गोमांस वाहतूक करणारे चार अटक ; स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार कॅम्प पोलिसांची संयुक्त कारवाई.

  
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नाशिक परिक्षेञ विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या सूचनेनुसार अहमदनगर पोलिसांनी  दोन वाहने पकडून चारजणांना अटक केली आहे. या दरम्यान, दोन्ही वाहनातील  अंदाजे १,७०० किलो गोमांस मिळून  एकूण ११ लाख ३० हजार  रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा व भिंगार कॅम्प पोलिसांची संयुक्त कारवाई केली आहे.
स्कार्पिओ चालक ताहेर साजीद शेख ( वय २७, रा. कोठला झोपडपट्टी, अहमदनगर), पिकअप चालक अब्दूल सत्तार हसनभाई तांबोळी ( वय ४२, रा. भाजीबाजार, शिरूर, ता. शिरुर, जि. पुणे),  नदीम नादीर शहा ( वय २५, रा. भाजी बाजार, शिरूर, जि. पुणे), मोहमंद अल्ताफ कुरेशी (वय ३०, रा. रा. भाजीबाजार, शिरूर, जि. पुणे ) असे ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार  पथकातील पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ संदीप घोडके, पोना दिनेश मोरे, संदीप पवार, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे व पोकाॅ मेघराज कोल्हे आणि भिंगार कॅम्पचे सपोनि शिरिषकुमार देशमुख, पोना व्दारके, खेडकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 
 स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अहमदनगर शहर व परिसरामध्ये पेट्रोलींग करुन अवैध गोवंश जातीचे जनावरांची कत्तल व गोमांस वाहतूकीबाबत माहिती घेत होते. त्या दरम्यान पोनि अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली कि, एक सफेद रंगाची स्कार्पिओ जिप  (एमएच १६ एव्ही-०७०७) व महिन्द्रा बोलेरो पिकअप (एमएच १४ एचजी ८४४१) या दोन वाहनामधून महाराष्ट्र राज्यात बंदी असलेल्या गोमांसाची वाहतूक होत आहे.  यावरुन पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी दोन पंच व पशु वैद्यकिय अधिकारी यांचेसह नगर-जामखेड रोडवरील कॅन्टोन्मेंट नाका येथे जावून सापळा लावला असता काही वेळातच निंबोडी बाजूकडून आलेल्या दोन्ही वाहनांना पकडण्यात आले. चालक ताहेर साजीद शेख, चालक अब्दूल सत्तार हसनभाई तांबोळी, नदीम नादीर शहा, मोहमंद अल्ताफ कुरेशी यांना ताब्यात घेतले.
दोन्ही  वाहनांची झडती पंचासमक्ष  घेतली असता, दोन्ही वाहनामध्ये अंदाजे १,७०० किलो गोमांस मिळून आल्याने सदरचे गोमांस व दोन्ही वाहने असा एकूण ११ ३०,०००/- रु. किं. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments