Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यात १० ठिकाणाच्या अवैध धंद्यावर 'एलसीबी' पथकांची छापे ; ३ लाखांचा मुद्देमाल जप्तऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द राबवलेल्या धडक विशेष मोहिमेअंतर्गत १० ठिकाणी छापे टाकून ११ जणांविरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात येऊन  २ लाख ८८ हजार रु. किं. चा मुद्देमाल जप्त केल्याची धडकेबाज कारवाई  स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे.
नाशिक  विशेष पोलीस महानिरीक्षक  व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलिस अधीक्षक  सौरभकुमार अग्रवाल  व श्रीरामपूर अपर पोलिस अधीक्षक दिपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि अनिल कटक यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी ही कारवाई केली आहे.  

याबाबत समजलेले माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाईची विशेष मोहीम राबवून दि.२२ ते दि. २३ जुलै २०२१ चे दरम्यान १० ठिकाणी छापे टाकून एकूण २ लाख ८८ हजार  रु. किं. चा मुद्देमाल गावठी हातभट्टीची तयार दारु, कच्चे रसायन, भट्टीची साधने जप्त करुन खालील प्रमाणे ११ आरोपी विरुध्द श्रीगोंदा, सोनई, तोफखाना, नगर तालूका, पारनेर, श्रीरामपूर शहर व श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. 
👉याप्रमाणे श्रीगोंदा पो.स्टे. गुरनं. ४८५ / २०२१, म.प्रो.का.कलम ६५ (फ), (क), (ड), (ई) जप्त मुद्देमाल :- ३४,०००/-रु. किं. ची गावठी दारु, कच्चे रसायन व भट्टीची आरोपीचे नांव :- तात्या दौलतराव काळे, रा. लिंपणगाव (ता. श्रीगोंदा). सोनई पो.स्टे. गुरनं. २५२ / २०२१, म.प्रो.का.कलम ६५ (फ), (क), (ड), (ई) प्रमाणे जप्त मुद्देमाल :- १७,५००/-रु. किं. ची गावठी दारु व कच्चे रसायन. आरोपी दास उर्फ दास्या सुरतमल भोसले, रा. चांदा ते कौठा शिव रस्ता, कौटा शिवार ( ता. नेवासा),  सोनई पो.स्टे. गुरनं. २५३ / २०२१, म.प्रो.का. कलम ६५ (फ), (क), (ड), (ई) प्रमाणे जप्त मुद्देमाल :- १३ हजार रु. किं. ची गावटी दारु व कच्चे रसायन. आरोपी देविदास उर्फ काकासाहेब रामभाऊ वैरागर, रा. चांदा ते कौठा शिव रस्ता, कौठा शिवार, ता. नेवासा ४) तोफखाना पो.स्टे. गुरनं. मा ६१३/२०२९, म.प्रो. का. कलम ६५ (ई) प्रमाणे आरोपी सायबा तायगा लोखंडे (वय- ४५, रा. वैदूवाडी, भिस्तबाग रोड, अ.नगर), शरद पवार. जप्त मुद्देमाल ४ हजार  रु. किं. ची गावठी दारु नेप्ती (ता. नगर), नगर तालूका पो.स्टे. गुरनं. ४१५/२०२१, म.प्रो. का. कलम ६५ (फ), (क), (ड), (ई) प्रमाणे जप्त मुद्देमाल :- ३० हजार  रु. किं. ची गावटी दारु, कच्चे रसायन आरोपीचे नांव : पोपट गिरधारी गिन्छे, रा. खंडाळा (ता. नगर)  व भट्टीची साधने. श्रीरामपूर शहर पो.स्टे. गुरनं. ४८९ / २०२१, म.प्रो. का. कलम ६५ (फ), (क), (ड), (ई) प्रमाणे जप्त मुद्देमाल  ९ हजार रु. किं. ची गावटी दारु व कच्चे रसायन. आरोपी बेबी राजू गायकवाड (रा. वडारवाडा, श्रीरामपूर ). श्रीरामपूर तालूका पो.स्टे. गुरनं. मा २२२ / २०२९, म.प्रो. का. कलम ६५ (फ), (क), (ड), (ई) प्रमाणे जप्त मुद्देमाल :- २८ हजार रु. किं. ची गावठी दारु व कच्चे रसायन आरोपीचे नांव :- शानदेव हूकरे, (रा. वडार गल्ली, टाकळीभान, ता. श्रीरामपूर), श्रीरामपूर तालूका पो.स्टे. गुरनं. २२३/२०२९, म.प्रो. का. कलम ६५ (फ), (क), (ड), (ई) प्रमाणे जप्त मुद्देमाल ३१ हजार रु. किं. ची गावठी दारु व कच्चे रसायन. आरोपी प्रकाश डुकरे (रा. वडार गल्ली, टाकळीभान, ता. श्रीरामपूर),  श्रीरामपूर तालूका पो.स्टे. गुरनं. मा २२४/२०२९, म. प्रो. का. कलम ६५ (ई) प्रमाणे जप्त मुद्देमाल १ हजार ५००/- रु. किं. ची गावठी दारु. आरोपी रजनी राजेन्द्र जाधव (रा. विठ्ठल मंदीराजवळ, टाकळीभान, ता. श्रीरामपूर १०) पारनेर पो.स्टे. गुरनं. २२४/२०२१, म.प्रो. का. कलम ६५ (फ), (क), (ड), (ई) प्रमाणे जप्त मुद्देमाल  १ लाख २० हजार रु. किं. ची गावठी दारु, कच्चे रसायन व भट्टीची साधने.आरोपी बाबाजी मारुती चाटे ( रा. शिरापूर, ता. पारनेर) आदिंवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.


Post a Comment

0 Comments