Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

पो.नि. मानगांवकर यांच्याकडून कोतवाली कामकाजाचे अवलोकन ; टपाल दिरंगाईवरून एकास मेमो

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 अहमदनगर -  कोतवाली पोलीस ठाण्याचे पो. नि. राकेश मानगांवकर हे कामावर हजर होताच, ठाण्यातील सर्व  पोलिस कर्मचाऱ्यांच्या कामकाजाचा आढावा गुरुवार (दि. 29) सकाळी घेतला. यावेळी टपाल दिरंगाई कारणावरून एका  कर्मचा-यास  मेमो दिला.

 यादरम्यान ज्या कर्मचाऱ्यांकडे टपाल दिरंगाई आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांवर  कारवाई करण्याचा इशारा देत, एका कर्मचाऱ्याला त्यांनी मेमो दिला. यावेळी  प्रत्येक कर्मचाऱ्यांच्या कामाचे अवलोकन पो. नि. मानगांवकर यांनी प्रत्यक्ष कर्मचा-यांना बोलावून माहिती घेत करून घेतले. यात  टपाल पेंडन्सीबाबत माहिती घेतली, टपाल पेंडन्सी तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments