Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सोनाली तनपुरे यांची सिटी केअर हॉस्पिटलला सदिच्छा भेट

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : ना. प्राजक्ता  तनपुरे  यांच्या पत्नी सौ.सोनाली तनपुरे यांनी सिटी केअर हॉस्पिटलला सदिच्छा भेट दिली.साठ  दिवस कोरोनाशी कडवी झुंज देत बरे झालेले .परदेशी , राहुरीकर यांची त्यांनी चौकशी केली.कोविडच्या राहुरीतील रुग्णांना सिटीकेअर मध्ये मिळालेले उपचार व आधार यामुळे अनेक रुग्ण बरे झाले असून यासर्व रुग्णांच्या  वतीने आभार मानत त्यांनी यापुढेही असेच सहकार्य मिळावे अशी आपेक्षा व्यक्त केली.सिटीकेअर तर्फे डॉ. संदीप सुराणा यांनी सौ.सोनाली तनपुरे यांचे स्वागत केले व सत्कारकेला.यावेळी ऋशाली  तनपुरे,तन्वी परदेशी,मनीषा पंदे  आदि उपस्थित  होते.
 अमित आहाळे व आमच्या संपूर्ण टीमने उत्कुष्ठ काम केल्याने कोव्हिड रुग्णांना उत्तम सेवा दिली गेली. 


राहुरीतील अनेकांना येथे अतिशय योग्य उपचार मिळाल्याने ते बरे झाले. तसेच सिटी केअर कोव्हिड सेंटर मधील मृत्यू दर सर्वात कमी होता ही महत्वाची गोष्ट असून यापुढील काळात येणाऱ्या तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी आमची सर्व टीम तयार आहे, अशी माहिती डॉ.सुराणा यांनी दिली. पूर्ण महिनाभर पुरेल इतका ऑक्सिजन साठा, औषधे उपलब्ध असून या कामी ना.,तनपुरे साहेबांची मोलाची साथ व मार्गदर्शन मिळत आहे असेही सांगितले.
सिटी केअर लवकरच नवनवीन सेवा उपलब्ध करून देणार असून पुनः नव्याने आरोग्य शिबिरे घेवून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचे सेवाभावी कार्य सतत सुरु राहील अशी माहिती यावेळी हॉस्पिटल तर्फे देण्यात आली.

Post a Comment

0 Comments