Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ऑनलाईन भजन स्पर्धाचे आयोजन ; श्री संत शेख महंमद महाराज प्रतिष्ठानचा उपक्रम

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - वारी ही आपली आत्मिक भावना आहे. याच भावनेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने श्री संत शेख महंमद महाराज प्रतिष्ठानने ऑनलाईन भजन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या नाविन्यपूर्ण वारी महोत्सवात राज्यभरातील अनेकांनी सहभाग नोंदवला आहे. आता या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी फक्त पाच दिवस उरले आहेत. त्यामुळे अधिकाधिक भाविकांनी सहभाग नोंदवून ऑनलाईन भजन सोहळ्याचा आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन श्री संत शिरोमणी शेख महंमद महाराज प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  सिध्दीनाथ मेटे महाराज यांनी केले आहे.


याबाबत अधिक माहिती देताना श्री मेटे महाराज म्हणाले की, यंदाचीही पंढरीची वारी रद्द झाली आहे. मात्र आधुनिक काळात तंत्रज्ञानाचा वापर करून ही वारीची उणीव आपण भरून काढू शकतो. त्यादृष्टीने राज्यस्तरीय ऑनलाइन भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. प्रतिष्ठानने पीडीएफ स्वरूपातील अभंग पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. त्यातील निवडक अभंगाचे व्हिडीओ चित्रण करून पाठवावा. स्पर्धकांनी अभंग गायनाचे व्हिडीओ 72 49 73 85 46 या व्हॉट्सअप क्रमांकावर पाठवावेत, असे आवाहन सचिव किसन आटोळे यांनी केले आहे. 
व्हिडीओ पाठवण्याची अंतिम मुदत  20 जुलै 2021  (आषाढी एकादशी) पर्यंत असणार आहे.  स्पर्धेचा निकाल  1 ऑगस्ट रोजी जाहिर करण्यात येईल.
 👉बक्षिसे
*छोटा गटासाठी -*
 प्रथम बक्षिसः 3,000 /-, द्वितीय बक्षिसः 2,000 /-, तृतीय बक्षिसः 1000 /-
👉मोठा गटा
 प्रथम बक्षिसः 5,000 /-, द्वितीय बक्षिसः 4,000 /-, तृतीय बक्षिसः 3,000 /-


Post a Comment

0 Comments