Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

भिंगार परिसरात हत्याराचा धाक दाखवून चोऱ्या करणारा अटक ; एलसीबीची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- भिंगार शहर व परिसरामध्ये रात्रीचे वेळी हत्याराचा धाक दाखवून चोऱ्या करणारा आरोपी जेरबंद करण्यात  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. श्रीहरी हरिदास चव्हाण (वय १९, रा. वाळकी, ता. नगर, ह.रा. वाळूंज, ता. नगर) असे पकडण्यात आलेल्याचे नावे आहे.
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना गुन्हा करणा-याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके यांना मिळाली. त्यानुसार श्री कटके पथकाला सूचना दिल्या. पथकाने वाळूज येथे जाऊन शोध घेऊन आरोपी श्रीहरी चव्हाण याला पकडण्यात आले. उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यास विश्वासात घेऊन कसून पोलिसांनी चौकशी केली. यावेळी त्याने सदरचा गुन्हा हा त्याचे साथीदार नसादीस जाकीट काळे (रा. वाळूज, ता. नगर) व साहेबराव आनंदा गायकवाड अशांनी मिळून केला असल्याची माहिती दिली. परंतु पोलिसांनी त्याच्या साथीदार आरोपींचा शोध घेतला असता ते मिळून आले नाहीत. 
आरोपी चव्हाण याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता, त्याचेकडे गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मालापैकी ३ हजार रु. किं. चा सॅमसंग कं. चा मोबाईल तसेच त्याव्यतिरिक्त २२ हजार रु. किं. चे दोन विवो कंपणीचे मोबाईल व २ लाख  रु. किं. ची बुलेट मो.सा. (एमएच-१६-सीआर-९९०१) असा एकूण २ लाख  २५ हजार रु. किं. चा मुद्देमाल मिळून आल्याने तो जप्त केला. आरोपीस मुद्देमालासह भिंगार कॅम्प पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.  
स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकॉ सुनिल चव्हाण, पोना दिपक शिंदे, शंकर चौधरी, संदीप चव्हाण, प्रकाश वाघ, आकाश काळे, रविन्द्र घुंगासे, चालक पोहेकाॅ संभाजी कोतकर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.


Post a Comment

0 Comments