Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

चोरीच्या मोटारी विकत घेणा-यास अटक, मोटारी जप्त : चोरटा फरार ; कर्जत पोलिसांची कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
कर्जत-  शेतकऱ्याच्या चोरीस गेलेल्या तीन पाणी उपसा करणारे मोटारी विकत घेणा-यास पोलिसांनी अटक केली असून, मोटार चोर फरार झाला आहे, त्या चोरट्याचा कर्जत पोलिस कसून चौकशी करीत आहेत. शब्बीर महबूब शेख ( रा. मिरजगाव, ता. कर्जत) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर  देवा मोहन वायसे (रा. मुळेवाडी) हा चोरटा फरार आहे.
 कर्जत उपविभागीय पोलिस अधिकारी  अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार  पोउपनि रमेश साळुंखे, सपोनि सुरेश माने, पोकाॅ प्रबोध हंचे, भाऊसाहेब यमगर, सुनील मालशिखरे, श्याम जाधव, विकास चंदन, अमित बर्डे, सुनील खैरे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, कर्जत तालुक्यातील मुळेवाडी येथे  दि. 14  ते 22 जानेवारी 2021 दरम्यान शेतकरी बाळू काशिनाथ जगधने व अजिनाथ काशिनाथ जगधने यांच्या पाणी उपसा करणाऱ्या तीन मोटरी चोरी गेल्या होत्या. मोटरीचा शोध न लागल्याने बाळू काशिनाथ जगधने (रा.मुळेवाडी ता. कर्जत जि. अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुरंन.  253/ 2021 भादवि कलम 379 प्रमाणे दि.24/04/2021 रोजी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  या दाखल गुन्ह्यातील मोटारी चोरीबाबत कर्जत पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत  पाण्याच्या उपसा करणारे मोटारी या देवा मोहन वायसे याने चोरी करून शब्बीर महबूब शेख (रा. मिरजगाव, ता. कर्जत) यांचेकडे दिल्या आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीनुसार कर्जत पो. नि. चंद्रशेखर यादव यांनी तात्काळ पोलीस पथकाला सूचना दिल्या. पथकाने  मिरजगाव येथे जाऊन खात्री केली असता तेथे शब्बीर महबूब शेख (रा. मिरजगाव) याच्या ताब्यात मुळेवाडी येथील चोरीच्या तीन पाणी उपसा मोटरी मिळून आल्या. शब्बीर शेख कडे विचारपूस केली असता, त्याने  देवा मोहन वायसे याने मोटर आणून विकल्या आहेत, असे सांगितले. त्यामुळे सदर गुन्ह्यात आरोपी  शब्बीर महबूब शेख याला अटक करण्यात आली. देवा मोहन वायसे हा फरार आहे. त्याचा शोध घेण्याचे काम कर्जत पोलिसांकडून सुरू आहे.

Post a Comment

0 Comments