Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुलीऐवजी ती महिलाच आपल्या जावयाच्या प्रेमात

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
प्रेमापोटी माणसे काहीही करायला तयार होतात. इथे तर सासूने थेट आपल्या जावयालाच पटवल आहे. या घटनेमुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आपल्या मुलीचा संसार आनंदात व्हावा यासाठी आई सर्वात जास्त धावपण करत असते इथे मात्र आईनेच स्वत:चा नवा संसार थाटला आहे. ही घटना आहे उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर येथील. इथे राहणारी एक ५० वर्षीय महिला आपल्या जावयाच्याच प्रेमात पडली. काही दिवसांपूर्वीच तिने आपल्या तरुण मुलीचे लग्न लावून दिले होते. पण मुलीऐवजी ती महिलाच आपल्या जावयाच्या प्रेमात पडली. प्रेमात पडलेल्या या सासूने कोणताही विचार न करता आपल्या २५ वर्षीय जावयासोबत पळून जाण्याचा निर्णय घेतला. या घटनेमुळे सर्वानाच धक्का बसला आहे. सासू आणि जावयाचे प्रेमप्रकरण कोणाच्याचं पचनी पडलेले नाही.

काही महिन्यापूर्वी या महिलेने आपल्या मुलीचे लग्न लावन दिले. मात्र मुलगी माहेरी आल्यावर तिच्या नवऱ्याला पाहून ती त्याच्या प्रेमातच पडली. एवढच नाही तर जावई देखील सासूच्या प्रेमात पडला होता. दोघांचेही चांगलेच प्रेमसंबंध जुळून आले. दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंत बुडाले होते. अनेक दिवस सासू आणि जावयाचे प्रेमप्रकरण सुरु होते. त्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही अचानक घरातून पळून गेले. तब्बल दहा महिन्यानंतर सासू जावयाचे प्रेमी युगुल पुन्हा घरी परतले. त्यावेळी त्यांनी कोर्ट मॅरेज केल्याचे कबूल केले. हे ऐकून मुलगी आणि तिच्या घरच्यांना चांगलाच धक्का बसला. याविरुद्ध तक्रार करण्यासाठी मुलगी तिचे वडिल आणि संपूर्ण कुटुंब पोलिसात दाखल झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गावातील एका ५० वर्षीय महिलेचे तिच्या सख्या जावयासोबत प्रेमप्रकरण सुरु होते. दोघांनी पळून जाऊन लग्न केले. त्यानंतर ते १० महिन्यांनी घरी परतले असून बळजबरी ते घरात घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दोघांनाही समज दिली मात्र दोघेही कोणाचेच एकायला तयार नाही. दोघांमुळे दोन्ही कुटुंबाची समाजात नालस्ती झाली. दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments