Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सुबाभूळ शेतीतून शेतकर्‍यांना शाश्वत उत्पन्नाची हमी

शुक्रवार दि.9 रोजी ऑनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा नगर : शेतकर्‍यांना खात्रीशीर व शाश्वत उत्पन्न मिळण्यासाठी सुबाभूळ शेती अतिशय उपयुक्त ठरणारी आहे. कागद बनविण्यासाठी सुबाभळीचा उपयोग होत असल्याने अनेक कंपन्या या शेतीला प्रोत्साहन देत आहेत. नगर जिल्ह्यातील शेतकर्‍यांना सुबाभूळ शेतीचे फायदे व महत्त्व कळण्यासाठी शुक्रवार दि.9 जुलै रोजी सकाळी 11 वाजता झूम ऍपच्या माध्यमातून ऑनलाईन मार्गदर्शन व कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी शेतकर्‍यांचे आर्थिक उत्पन्न वाढण्याच्या दृष्टीने रोटरी विविध उपक्रम राबविणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे अध्यक्ष ईश्वर बोरा यांनी दिली. रोटरी सेंट्रल व जे.के.पेपर लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यात जे.के.पेपरचे डॉ.सुधीर चौहान, गोविंद राव, महेश लवटे हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. सुबाभळीचे पर्यावरणीय फायदेही अनेक आहेत. या वनस्पतीची मुळे खोलवर जात असल्याने तिला दुष्काळात धक्का बसत नाही शिवाय जास्त पाण्यातही सुबाभूळ तग धरून राहते. सुबाभळीमुळे होणार्‍या नत्र स्थिरीकरणाने जमिनीची सुपीकता टिकून राहते. सुबाभळीचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्‌य म्हणजे ती जमिनीत पाणी टिकवून ठेवायला मदत करते, त्यामुळे जमीन क्षारपड होत नाही. कागद निर्मितीत सुबाभळीचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याने कंपन्या थेट शेतकर्‍यांशी करार करून जागेवर येवून माल उचलतात. शेतकर्‍यांना शाश्वत आर्थिक उत्पन्न मिळवण्यासाठी ही शेती अतिशय उपयुक्त असून कमी खर्चात अधिक उत्पन्नाची हमी देणारी असल्याचे चौहान यांनी सांगितले. या कार्यशाळेचा शेतकर्‍यांनी आवर्जून लाभ घ्यावा असे आवाहन रोटरीच्या वतीने सेके्रटरी डॉ.दिलीप बागल, पर्यावरण संचालक अमृत कटारिया, मनोज आरकल यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी संपर्क - 9823799998, 95523 83536, 94222 23670, 98509 35393

Post a Comment

0 Comments