Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मुरळीवर अत्याचार करणा-या आरोपीचा जामीन नामंजूर

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- नगर तालुक्यातील जागरण गोंधळ कार्यक्रम करणा-या मुरळीवर तिघांनी अत्याचार केला म्हणून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात  दाखल झालेल्या गुन्हयातील ३ आरोपीपैकी एका आरोपीचा (आकाश मळुराम पोटे रा. निंबोडी ता. नगर) यांचा जामीन अर्ज अहमदनगर येथील जिल्हा न्यायाधिश मा.मंजुषा व्ही देशपांडे यांनी नुकताच फेटाळला आहे. या प्रकरणी मूळ फिर्यादी अत्याचारीत महिलेतर्फे ॲड सुरेश लगड यांनी काम पाहिले. 

याबाबतची माहिती अशी की, दि.१ एप्रिल २०२१ रोजी अत्याचारित महिला जागरण गोंधळ कार्यक्रम पार पाडून तिच्या घरी वाघ्याबरोबर मोटारसायकलवर जात होती. या दरम्यान  मध्यरात्री आरोपी व त्याचे बरोबर दोनजण असे तिघांनी मिळून तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिच्यावर अत्याचार केला. त्यांचेकडे असलेले ९ हजार रु. काढून घेतले. त्यांना मारहाण केली म्हणून कॅम्प पोलिस ठाण्यात  अत्याचारीत महिलेने लेखी फिर्याद दिल्याने पोलिसानी भारतीय दंड विधान कलम ३७६(ड) ३९४,३२४,३२३,५०४,५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला.  पुढे तपास करुन सदर गुन्हा करणारे आकाश मळूराम पोटे व इतर दोन आरोपी निष्पन्न झाल्याने या आरोपीस इतर दोघाविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलेली आहे.
आरोपी आकाश मळू पोटे यांस जामीन मंजूर केल्यास माझे जिविताला धोका होईल. एका निर्जनस्थळी नेवून रात्रीची वेळ बघून माझ्या अहाय्यतेचा फायदा घेऊन माझेवर अत्याचार केलेला असल्याने त्याना कुठल्याही परिस्थिती जामीन मंजूर करू नये" अशी विनती अत्याचारीत महिलेने ॲड सुरेश लगड यांचे मार्फत न्यायालयात केलेली होती. विशेष म्हणजे धक्कादायक बाब अशी की, या अत्याचारीत महिलेने एका महिला वकीलामार्फत माझ्याकडून गैरसमजुतीने फिर्याद दिली गेली असल्याने आरोपीस जामीन मंजूर करण्यास हरकत नाही,असे लिहून दिलेले होते. अखेर न्यायालयाने वस्तुस्थिती समजावून घेऊन आरोपीकडून मूळ फिर्यादी महिला व साक्षीदार यांचेवर दबाब येऊ शकतो. आरोपी जामीनावर सुटल्यास तो मिळून येणार नाही. त्यामुळे आरोपीचा जामीन नामंजूर करणे योग्य राहील, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे. त्याप्रमाणे आरोपी आकाश मळू पोटे यांचा जामीन जिल्हा न्यायाधिश सौ मंजूषा व्ही देशपांडे यांनी नामंजूर केला आहे. या प्रकरणांत कॅम्प पोलिस ठाण्याचे सपोनि एस के देशमुख यांची फिर्यादी पक्षास मदत झालेली आहे. Post a Comment

0 Comments