Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर अर्बन बँक शेवगाव शाखेच्या व्यवस्थापकाची आत्महत्या

 
👉आत्महत्येपूर्वी लिहलेली चिठ्ठी आढळली 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
शेवगाव  - नगर अर्बन बँकेच्या शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (वय ५८, रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (दि. २७)  दुपारी ३-३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. या घटनेने शेवगाव तालुक्यासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली गेली आहे. प्रामाणिक अधिकाऱ्यांचा बळी गेल्याबद्दल शेवगाव बाजारपेठेत हळहळ व्यक्त होत आहे.
 मयत गोरक्षनाथ शिंदे यांच्या खिश्यामध्ये आत्महत्येपुर्वी लिहलेली एक चिठ्ठी आढळली आहे. मात्र या चिठ्ठीत काय लिहिले याबाबत तपशील मात्र समजू शकले नाही.

 याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक गोरक्षनाथ सूर्यभान शिंदे (रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) हे दि. ३१  मे २०२१ रोजी सेवा निवृत्त झाले होते. मात्र बँक प्रशासनाने त्यांचा सेवाकाळ तीन महिण्यासाठी वाढवून दिला होता.
मंगळवार दि. २७ रोजी सकाळपासून गोरक्षनाथ शिंदे हे घरातून बाहेर पडले होते. सकाळपासून ते घरी न आल्यामुळे त्यांच्या घरच्यांनी सर्वत्र शोध घेतला असता दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास  शेतामध्ये त्यांनी विषारी औषध घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. सदर घटनेची खबर शेवगाव पोलीस ठाण्यात मयताचे चुलत भाऊ कचरू तुकाराम शिंदे यांनी दिली आहे 
  याप्रकरणी शेवगाव पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शेवगाव ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला आहे.
या दुदैवी घटनेची माहिती शेवगाव  तालुक्यास जिल्ह्यात समजताच एकच खळबळ उडाली. 
आत्महत्येपूर्वी गोरक्षनाथ शिंदे यांनी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये काय मचकूर आहे, ते समजू शकले नाही. यामुळे चिठ्ठीत कोणाचे नाव आहे? याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. मात्र याबाबत पोलिसांकडून मौन पाळले जात आहे. यात कोण दोषी कोण याची जनतेत चर्चा होती 
----------------------- 
📲📲📲
शेवगाव शाखेतील बनावट सोने प्रकरण मयत शिंदे यांनीच निदर्शनास आणून उघड केले होते त्याबाबत त्यांनी बँकेच्या वरिष्ठांना प्रथम माहिती दिली होती याची जोरदार चर्चा शहरात नागरिकांतून बोलले जात आहे.
दोषी नसतानाही हा अत्यंत साहसी प्रामाणिकपणे काम करणाराच नाहक बळी गेला अशी प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून आत्महत्यास प्रवृत्त करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी ग्राहकातून जोरदार मागणी होत आहे.

👉तर मयत शिंदे हे गेल्या दोन-तीन दिवसापासून पोलीस ठाण्याच्या आवारात फिरकत होते अनेकांनी त्यांना पाहिले आहे मात्र कशासाठी पोलीस ठाण्यात आले याचे कारण गुलदस्त्यात आहे सखोल चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल त्या पद्धतीने चौकशी होणे गरजेचे आहे हे तितकेच खरे  

👉गोल्ड व्हँल्युअर व खातेदार यांनी फसवणूक केलेली आहे. माझा यात काहीही दोष नाही. माझी फसवणूक झालेली असून कृपया मला माफ करावे. अशा आशयाचा मजकुर आढळून आला आहे.

Post a Comment

0 Comments