Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

जबरी चोऱ्या करणारे आरोपी जेरबंद : ११ गुन्हे उघडकीस ; नगर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 अहमदनगर- जबरी चोर्‍या व इलेक्ट्रिक मोटार चो-या करणा-या तीन आरोपींना अटक करण्यात येऊन, ११ गुन्हे उघडकीस आणून सोन्याचे दागिने व ८  इलेक्ट्रिक मोटारी असा १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्याची महत्त्वपूर्ण धडकेबाज कारवाई नगर तालुका पोलिसांनी आहे. दीपक मुरलीधर घायमुक्ते (वय २३), किरण बापू घायमुक्ते (वय ३१ रा.देऊळगाव ता.जि.अहमदनगर), अमोल शहाजी गायकवाड (वय २६ रा.वडगाव तांदळी ता.जि.अहमदनगर) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
 नगर तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि राजेंद्र सानप यांच्या सूचनेनुसार पोउपनि डी आर जारवाल, पोहेकाॅ शैलेश सरोदे, लगड, पोना योगेश ठाणगे, बाळू कदम, पोकाॅ संदीप जाधव, धर्मराज दहीफळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


नगर तालुका पोलीस ठाण्याचे श्री सानप यांना देऊळगाव सिद्धी येथील काहीजण त्यांच्या साथीदार इलेक्ट्रिक मोटार चोरी करून त्या तोडून भंगारमध्ये विक्री करत आहेत, अशी माहिती त्यांना मिळाली होती. श्री सानप यांनी पोलीस पथकाला दिलेल्या सूचनेनुसार पथकाने देऊळगाव सिद्धी (ता. जि. अहमदनगर) परिसरातून दीपक व किरण घायमुक्ते आणि अमोल गायकवाड यांना पकडण्यात आले. या तिघांना पोलिसांनी पोलीस खाक्या दाखविताच त्यानी गुन्हा केल्याची कबुली दिली. नगर तालुका भिंगार, कॅम्प पोलिस ठाणे हद्दीत ११ दाखल गुन्ह्यांची कबुली देऊन सोन्याचे दागिने व ८ इलेक्ट्रिक मोटार असा १ लाख ५० हजाराचा मुद्देमाल काढून दिला.

Post a Comment

0 Comments