Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गावठी पिस्तूल विक्री करणारे अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर : अहमदनगर-जामखेड रस्त्यावरील टाकळी काझी शिवारातील बंद असलेल्या टोल नाक्याजवळ गावठी पिस्तूल विक्री करताना दोघांना पकडण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी केली.

संदीप पोपट गायकवाड (वय ४०, रा. जांबूत, ता. शिरुर, जि. पुणे), भारत भगवा हतागळे (वय २५, रा. गोविंदवाडी, तलवाडा, ता. गेवराई, जि. बीड) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.
गायकवाड व हतागळे या दोघांकडून दोन गावठी पिस्तूल, दोन जिवंत काडतूसे व दोन मोबाईल, असा एकूण ८० हजार ६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके यांच्या सूचनेनुसार सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, सफौ भाऊसाहेब काळे,  विजयकुमार वेेेठेकर, संदीप घोडके, पोना शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, लक्ष्मण खोकले, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पोकाॅ राहुल सोळंके आदिंच्या पथकाने ही कारवाई केली.

Post a Comment

0 Comments