Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

माथाडी कामगार मंडळातील दत्तात्रय बनकर व विठ्ठल शिरसाठ यांचा सेवानिवृत्त

 

निवृत्तीनंतर मार्गदर्शक म्हणून काम करावे -अविनाश घुले
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
 अहमदनगर - माथाडी कामगार मंडळाच्यावतीने कामगारांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी नेहमीच प्रयत्न होत असतात. येथील कर्मचार्‍यांनी नेहमीच कामगारांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ या मंडळामार्फत देत असते. कर्मचार्‍यांच्या सहकार्यामुळे माथाडी कामगार व मंडळात नेहमीच समन्वयातून चांगले काम सुरु आहे. सेवानिवृत्त झालेले कर्मचारी दत्तात्रय बनकर व विठ्ठल शिरसाठ यांनी कामगारांना नेहमीच सहकार्य केले आहे. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी कामगारांचे मार्गदर्शक म्हणून यापुढील काळात काम करावे, असे प्रतिपादन हमाल पंचायतचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले यांनी केले.
 

माथाडी कामगार मंडळातील लेखपाल दत्तात्रय बनकर व रोखपाल विठ्ठल शिरसाठ यांचा सेवानिवृत्तीनिमत्त अहमदनगर जिल्हा हमाल पंचायतीच्यावतीने सत्कार करतांना जिल्हाध्यक्ष अविनाश घुले. याप्रसंगी उपाध्यक्ष गोविंद सांगळे, सचिव मधुकर केकाण, संजय महापुरे, तबाजी कार्ले, बबन सुसे, युवराज राऊत, सुनिल होळकर, अर्जुन शिंदे आदि उपस्थित होते.
 याप्रसंगी गोविंद सांगळे म्हणाले, हमाल पंचायत व माथाडी कामगार मंडळ यांचे नेहमीच सलोख्याचे संबंध राहिले आहे. कामगारांचे भविष्य उज्वल करण्यासाठी मंडळाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. त्यात कर्मचार्‍यांचा सक्रिय सहभाग महत्वाचा राहला आहे. सेवानिवृत्तीनंतर या कर्मचार्‍यांनी हमाल पंचायतीस सहकार्य करावे, असे आवाहन केले.
 सत्कारास उत्तर देतांना श्री.बनकर व श्री.शिरसाठ यांनी माथार्डी मंडळात काम करतांना सर्वांचे नेहमीच चांगले सहकार्य राहिले आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली माथाडी कामगारांसाठी विविध योजनांचा लाभ मिळवून देता आला याचे समाधान वाटते, असे सांगून हमाल पंचायत व माथाडी कामगारांने केलेल्या सत्काराबद्दल आभार मानले.
 यावेळी माथाडी कामगारांनी श्री.बनकर व श्री.शिरसाठ यांच्या कार्याचा उल्लेख करुन सन्मान केला.

Post a Comment

0 Comments