Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दरोडा व मोक्कातील दोन आरोपी अटक ; भिंगार कॅम्प पोलिसांची कारवाई

  

ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- सोलापूर टोलनाक्यावरील बहुचर्चित दरोडा व मोक्का यासारख्या गंभीर गुन्ह्यातील दोन आरोपींना चिचोंडी पाटील  शिवारात सापळा लावून पकडण्याची कारवाई भिंगार कॅम्प पोलिसांनी केली आहे. विक्रम आनंदा गायकवाड, बाबा उर्फ भाऊसाहेब सोपान आढाव (दोघे रा. वाळूंज ता.नगर जि. अहमदनगर ) अशी पकडण्यात असलेल्यांची नावे आहेत.

नगर शहर उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार कॅम्पचे सपोनी शिशिरकुमार देशमुख यांनी दिलेल्या सूचनेनुसार पोसई मंगेश बैंडकोळी,  पोना राहुल द्वारके,  पोना भानुदास खेडकर, पोना रघुनाथ कुलांगे, पोना गणेश साठे, चापोना अंबादास पालवे, चापोकाॅ अरूण मोरे, होम. केतन पटेकर, होम, निलेश विधावे आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की,सोलापूर टोलनाक्यावरील बहुचर्चित दरोडा व मोक्कातील गुन्हयात एकूण 8 आरोपींविरूद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यातील 5 आरोपींना अटक करण्यात आली असून आरोपी विक्रम आनंदा गायकवाड, बाबा उर्फ भाऊसाहेब सोपान आढाव (दोघे रा. वाळूज ता.नगर जि. अहमदनगर), आणि  बाळासाहेब रमेश भिंगारदिवे (रा. आगडगाव ता. नगर जि. अहमदनगर ) हे आरोपी गुन्हा घडल्यापासून फरार होते. त्या अनुषंगाने  विशेष पथक तयार करून फरार आरोपी यांना अटक करण्याचे आदेश  जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिले होते.
दरम्यान, दि. 26 जुलै 2021 रोजी भिंगार कॅम्पचे सपोनी शिशिरकुमार देशमुख यांना माहिती मिळाली की, कॅम्प पो स्टे गु.र.नं.2827/2020 भादवि कलम 395,397,324,323,504,506, आर्म अॅक्ट 4/25 मोक्का कलम 3(1)(11)3(2),(4)4 मधील आरोपी  विक्रम आनंदा गायकवाड,  बाबा उर्फ भाऊसाहेब सोपान आढाव हे वाळूंज "शिवार (ता. जि. अहमदनगर) येथे आले आहेत. त्यानुसार श्री देशमुख यांनी पोलीस पथकाला सूचना दिल्या. पथकाने चिचोंडी पाटील शिवारात  तात्काळ सापळा लावून आरोपींना पकडण्यात आले.  दोन्ही आरोपी हे गुन्हा घडले ठिकाणापासून फरार होते. सदर गुन्ह्याचा तपास उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग, अहमदनगर यांनी करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले आहे.

Post a Comment

0 Comments