Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

शिर्डीतील बांधकाम मजूर खून प्रकरणातील ४ आरोपी अटक ; नगर एलसीबी, शिर्डी उपविभागीय व शिर्डी पोलिसांची संयुक्त कारवाई

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
 अहमदनगर- शिर्डी येथे बांधकाम मजुराचा खून करणारे चार आरोपी नाशिक येथून अटक करण्यात अहमदनगर  पोलिसांना यश आले आहे.  अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखा, शिर्डी उपविभागीय कार्यालय आणि शिर्डी पोलिसांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.
राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे (वय 19 रा. पाथर्डीगाव सुखदेवनगर, नाशिक),  अविनाश प्रल्हाद सावंत (वय 19 रा. पाथर्डीगाव नाशिक),  अमोल सोलामान लोढे ( वय 32 रा. कालिकानगर शिर्डी),  अरविंद महादेव सोनवणे (वय 19 रा. श्रीरामनगर श्रीरामपूर-शिर्डी) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.


जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अप्पर पोलीस अधिक्षक दिपाली काळे,  शिर्डी उपविभागीय पोलिस अधिकारी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखा पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे,  पोसई गणेश इंगळे,  पोहेकाॅ दत्तात्रेय हिंगडे,  दत्तात्रय गव्हाणे,  मनोहर गोसावी, सुनील चव्हाण, पोना विशाल दळवी, शंकर चौधरी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, सचिन आडबल, पोकाॅ रविंद्र घुंगासे, संदीप चव्हाण, संदीप दरंदले, रोहित येमुल,  सागर ससाणे,  रंणजीत जाधव,  प्रकाश वाघ, राहुल सोळुंके,  मेघराज कोल्हे, चापोहेकाॅ उमाकांत गावडे, अर्जुन बडे, भरत बुधवंत,  शिर्डी पोलीस ठाण्याचे पो.नि प्रवीण लोखंडे, सपोनि दीपक गांधले, प्रवीण दातरे, पोसई बारकू जाने,  सपोनि सुरेखा देवरे,  सफौ कैलास कु-हाडे, पोकाॅ प्रमोद पळसे,  उपविभागीय शिर्डी विभागाचे पोना सुरेश देशमुख आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
दि. 29 जूनला ४ अनोळखी यांनी राजेंद्र दिवारे या बांधकाम मजुराचा खून करून दुचाकीवरून पळून गेल्याच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलिस ठाण्यात  दाखल गुन्हे नंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,  स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. अनिल कटके यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती. यानंतर तपासकामी वेगवेगळी पथके तयार करुन पथकांना वरिष्ठांनी सूचना दिल्या होत्या. तपासा दरम्यान संशयित आरोपींची 40 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले होते. त्यातून पोलिसांना तपासाची दिशा मिळाली. त्यानुसार आरोपी नाशिकमध्ये असल्याचे तपासात समोर आले. यावेळी नाशिक शहर आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या मदतीने आरोपी राजू उबाळे, अविनाश सावंत, अमोल लोढे व अरविंद सोनवणे यांना पकडण्यात अहमदनगर पोलिसांना यश आले आहे.

Post a Comment

0 Comments