Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मॅट विरोधात न्यायालयात जाणार : डाॅ. दत्ताराम राठोड


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर - बदली विरोधातील दाखल करण्यात आलेल्या याचिका महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिश (मॅट) ने फेटाळून लावली. मॅटचा निकाल मान्य नसल्याने न्यायालयात जाणार असल्याची माहिती तत्कालीन अप्पर पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड यांनी दिली.
श्री राठोड यांची ऑक्टोबर 2020 मध्ये नांदेड येथून अहमदनगरला बदली झाली होती. पदभार स्वीकारल्यानंतर महिन्याभरात राठोड यांनी अवैध धंद्यावाल्याची पळतीभुई केली होती. अनेक ठिकाणी छापे टाकून कारवाईचा धडका लावला होता. मोबाईल संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. याप्रकरणामुळे श्री राठोड यांची अचानक बदली करण्यात आली. बदली झाल्यानंतर श्री राठोड यांना नियुक्ती देण्यात आली नव्हती. याबाबत श्री राठोड यांनी मॅटकडे दाद मागितली. मॅटने दिलेल्या आदेशानुसार श्री राठोड यांना अमरावती येथे नागरी हक्क संरक्षणाचे पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती केली होती. माञ राठोड यांना अहमदनगरला हवी असल्याने श्री राठोड यांनी मॅट न्यायालयात याचिका दाखल केली होती. मॅटने श्री राठोड यांच्या बदली  विरोधातील याचिका फेटाळली. या मॅटच्या निर्णया विरोधात न्यायालयात जाणार असल्याचे  श्री राठोड सांगितले.

Post a Comment

0 Comments