Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

परमवीर सिंगांच्या अडचणीत वाढ,परमवीर सिंगांच्या अडचणीत वाढ, नाशिकमध्ये तक्रार दाखलत तक्रार दाखल

नाशिक ग्रामीण पोलीस दलातील उपअधिक्षक शामकुमार निपुंगे यांनी केलेल्या आरोपाने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. वाहतूक विभागातील गैरव्यवहार प्रकरणाचा पर्दाफाश केल्यामुळे सिंग यांनीच पोलीस हवालदार सुभद्रा पवार यांच्या मृत्यू प्रकरणात अडकविल्याचा धक्कादायक आरोप निपुंगे यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे. निपुंगे यांनी आडगाव पोलीस ठाण्यात २२ पानी तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी राज्य सरकारने गंभीर दखल घेतली असून, १४ जूनला तक्रार मग गुन्हा का दाखल केला नाही, अशी विचारणा विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी नाशिक शहर पोलिसांना केली असून, तत्काळ अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. ठाणे जिल्ह्यात २०१७ मध्ये निपुंगे यांच्या कार्यालयातील सुभद्रा पवार या महिला कर्मचार्‍याने आत्महत्या केली. त्यात निपुंगे यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची तक्रार नोंदवली होती. याबाबत निपुंगे म्हणाले, सुभद्रा पवार हत्या तिचा प्रियकर अमोल फफाळे याने केली हे उघड झाले. प्रत्यक्षात ती आत्महत्या नव्हे तर संशयास्पद खून झाल्याचे स्पष्ट असतानाही केवळ सिंग यांच्या सांगण्यावरून निपुंगे यांना अडकल्याची तक्रार आडगाव पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments