Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

गॅस सिलिंडरातून गॅसची चोरी ; नगर'तोफखाना डिबी'ने केली उघड👉तिघे ताब्यात, 43 सिलेंडरासह मुद्देमाल जप्त 
ऑनलाइन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : येथे भारतगॅस वितरक बाॅयकडून ग्राहकांच्या गॅस सिलिंडरमधून गॅस चोरून कश्या पद्धतीने फसवणूक केली जात होती, ही महत्त्वपूर्ण घटना शुक्रवार (दि.३०) सकाळी तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने उघडकीस आणली. यात तिघांना तोफखाना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल केला आहे. भगवानाराम गिरीधारीराम बिष्णोई (वय 23, डिलीव्हरी बॉय (कराचीवाला भारत गॅस) मुळ रा .मानेवरा, ता-बाप, जि- जोधपुर, राज्य राजस्थान हल्ली रा. बाळासाहेब गायकवाड यांचे खोलीमध्ये भाडेततत्वावर सिव्हील हाडको , सावेडी अहमदनगर), भजनलाल जगदीश बिष्णोई (वय 21), एक अल्पवयीन अशी ताब्यात घेणा-यांची नावे आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील   अपर पोलीस अधिक्षक  सौरभकुमार अग्रवाल,   नगर उपविभागिय पोलीस अधिकारी विशाल ढुमे यांचे मार्गदर्शनाखाली  तोफखाना पोलिस ठाण्याच्या पो.नि ज्योती गडकरी, पोउपनि सुरज मेढे, पोहेकॉ शकील सय्यद, पोना अविनाश वाकचौरे, पोना अहमद ईनामदार, पोना वसिम पठाण, पोना शैलेश गोमसाळे, पोकॉ सचिन जगताप, पोकॉ अनिकेत आंधळे, पोकॉ अभिजीत बोरुडे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. 
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि.30 जुलैला  अहमदनगर शहरातील सिव्हील हडको येथे बाळासाहेब गायकवाड यांच्या घराचे भाडेतत्वावर दिलेल्या खोलीमध्ये काही इसम हे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधुन कमर्शिअल गँस सिलेंडर मध्ये गँस भरत आहे, या मिळलेल्या माहितीनुसार तोफखाना पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी पोनि ज्योती गडकरी व डीबी पथकाने सापळा रचुन सदर ठिकाणी छापा टाकला. छाप्यामध्ये भगवानाराम गिरीधारीराम बिष्णोई, भजनलाल जगदीश बिष्णोई, एक अल्पवयीन हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडरमधून प्रत्येक टाकीतून  2 किलो घरगुती वापराचा गॅस हा लोखंडी पाईपच्या सहाय्याने कमरर्शिअल गॅस टाकीमध्ये गॅस भरतांना व  सिलेंडरचे सिल पूर्ववत करण्यासाठी गरम पाणी टाकून पुन्हा सिलबंध करतांना ते जागेवरच पोलिस पथकाला मिळून आले.  या दरम्यान आरोपींचे ताब्यातून घरगुती वापराच्या व कमर्शिअल अशा एकूण 43 सिलेंडर, एक बजाज कंपनीची मालवाहू आर. टी. कराचीवाला भारत गॅस नांव लिहीलेली अँपे रिक्षा (क्र. MH 16 AE 5833) गॅस भरण्याकरीता लागणारा एक लोखंडी पाईप व दोन वजनी काटा लोखंडी गजसह, सुर्या कंपनीचे गॅस शेगडी, तिला नळी व रेगुलेटर, असलेली एक लाईटर, एक स्टीलचे पातीले एक स्टीलचे तांब्या असा एकूण 93 हजार 174  रुपयाचा मुद्देमाल मिळून आला.  मुद्देमालाच्या साहाय्याने कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता जिवनावश्यक वस्तू भारत गॅसच्या टाक्यांमधील गॅसचा काळ्या बाजारात वापर करता यावा या गैर उद्देशाने चोरटयारितीने घरगुती वापराच्या भारत गॅसच्या टाकीमधील गॅस हा लोखंडी पाईपच्या सहाय्याने कमशिअल भारत गॅसच्या टाकीमध्ये भरत असतांना व लोकांच्या जिवितास धोका निर्माण होईल अशा रितीने स्वतःचे कब्जात ज्वलनशील पदार्थाचा साठा बाळगतांना मिळून आला.  आरोपींविरुद्ध पोउपनि सुरज मेढे यांच्या फिर्यादीवरून  भादवि कलम 285, 286, 336 जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 1955 चे कलम 3/7 प्रमाणे तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Post a Comment

0 Comments