Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

मनपाचा बडतर्फ उपमहापौर श्रीपाद छिंदम याच्याविरुध्द दोषापञ दाखल करण्यास तोफखाना पोलिसांना परवानगी

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- आरोपी श्रीपाद छिंदम याच्याविरुध्द न्यायालयात दोषापञ दखल करण्यास तोफखाना पोलिसांना गृह विभागाचे उपसचिव यांनी परवानगी दिली आहे.तोफखाना पोलीस सोमवारी छिंदम विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत.

याबाबत समजलेली माहिती अशी की,  आरोपी शासकीय पदावर असल्यामुळे सदर आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल कामी सीआरपीसी 196 अन्वय महाराष्ट्र शासन गृह विभाग यांची परवानगी आवश्यक असल्यामुळे याबाबत शासनास जिल्हा पोलिस प्रशासनाने पत्रव्यवहार केला होता. त्या अनुषंगाने गृह विभाग उपसचिव यांनी आरोपी श्रीपाद छिंदम याच्या विरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यास तोफखाना पोलिसांनी परवानगी दिली आहे. श्रीपाद छिंदम याच्यावर तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा र.नं 97/ 2018 कलम 295 (अ) 298, 153 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दि.16 फेब्रुवारी 2018 ला मोबाईलवर मिञ संभाजी अशोक कदम यांनी व्हाॅटसॲप ग्रुपवर मेसेस टाकला की,उपमहापौर छिंदम यांचेकडून बांधकाम विभागातील कर्मचारी अशोक बिडवे यास अपशब्द वापरल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झालेबाबत कर्मचा-यांनी युनियनकडे तक्रार केली आहे. तसेच त्याखाली एक ऑडिओ क्लिप होती. सदरची क्लीप फिर्यादी यांनी ऐकली असता, त्यामध्ये महानगरपालिकेचे कर्मचारी अशोक बिडवे यांना श्रीपाद छिंदम याने ' काल माणसे का नाही पाठवली नाही, असे विचारले असता, बिडवे यांनी छिंदम यास शिवजयंती होऊ द्या, असे म्हटले. त्यावेळी छिंदम याने महापुरुषाचा अपमान होईल असे वाक्य उदगारले. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात शिवसेनेचे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने तोफखाना पोलीस ठाण्यात गु.र.नं.97/2018 भादंवि कलम 295(अ),298,153 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याप्रकरणी अधिक तपास तोफखाना पोलीस ठाण्याचे सपोनि के.व्ही.सुरसे हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments