Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

नगर जिल्ह्यात 'एलसीबी' पथकांची ३६ अवैध धंद्यावर छापे ; ३८ जणांवर गुन्हे दाखल तर साडेपाच लाखाचा मुद्देमाल जप्त

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर : नाशिक परिक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील मनोज पाटील  यांचे मार्गदर्शनाखाली नगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी जिल्ह्यातील ३६ ठिकाणीवरील अवैध धंद्यावर छापे टाकून  ५ लाख ०६ हजार ८८० रु. किं. चा मुद्देमाल जप्त केल्याची धडकेबाज कारवाई केली आहे.

याबाबत समजलेले माहिती अशी की, नाशिक विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे आदेशाने जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील  मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी अहमदनगर जिल्ह्यातील अवैध धंद्याविरुध्द कारवाईची विशेष मोहीम राबवून दि. ११ जुलै  ते दि. २१ जुलै २०२१ चे दरम्यान ३५ ठिकाणी छापे टाकले. या छाप्यामध्ये  एकूण ५ लाख ०६ हजार ८८० रु. किं. चा मुद्देमाल गावठी हातभट्टीची तयार दारु, कच्चे रसायन, भट्टीची साधने जप्त करुन खालील प्रमाणे ३८ आरोपी विरुद्ध  जामखेड, सोनई, नगर तालुका, श्रीरामपूर शहर, राहूरी, कोतवाली, श्रीरामपूर तालूका, शिर्डी, भिंगार कॅम्प व कर्जत, शेवगाव, तोफखाना, एमआयडीसी, संगमनेर तालूका व पाथर्डी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

Post a Comment

0 Comments