Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

दोन गावठी कट्टयांसह २ आरोपी अटक; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

 


ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर
अहमदनगर  – दोन गावठी कट्ट्यासह दोन आरोपींना अटक करण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिसांनी केली आहे. प्रेम पांडूरंग चव्हाण, (वय ३७, रा. बाजारतळ, दुबेगल्ली, वॉर्ड नं. ७, श्रीरामपूर), आकाश राजू शेलार ( वय २१, रा. चितळी, ता. राहाता) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
याबाबत समजलेले माहिती अशी की, दि. १४ जुलै २०२१ रोजी शहरातील नॉर्दन बँच, दहाव्याचा ओटा परिसरात, दोन इसम हे गावठी कट्टे व जिवंत काडतसे विक्री करण्यासाठी, येणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके यांना मिळाली असता.पोलीस निरीक्षक कटके यांनी, मिळालेल्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अधिकार व अंमलदार यांना मिळालेल्या बातमीनुसार खात्री करुन कारवाई करण्याबाबत आदेश दिले. सदर आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी आलेल्या पथकाने हरातील नॉर्दन बँच, दहाव्याचा ओटा परिसरात सापळा रचून त्यानंतर काही वेळातच दोघे हे दहाव्याचा ओट्याजवळ आली. या दोन्ही इसमांच्या संशयास्पद हालचालीं लक्षात आल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने,मोठ्या शिथपीने आरोपी प्रेम पांडूरंग चव्हाण, (वय ३७, रा. बाजारतळ, दुबेगल्ली, वॉर्ड नं. ७, श्रीरामपूर), आकाश राजू शेलार ( वय २१, रा. चितळी, ता. राहाता) या दोघांना ताब्यात घेतले असता, त्यांच्या जवळून,२ गावठी बनावटी कट्टे व सात जिवंत काडतूसे असे एकूण ६३ हजार ५०० रु. किमतीचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जप्त केला. २ गावठी कट्टे व ७ जिवंत काडतूसे बेकायदेशिरित्या बाळगून विक्रीसाठी आणल्या प्रकरणी पोहेकॉ मनोहर गोसावी यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन, आर्म अॅक्ट कलम ३/२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून पुढील कार्यवाही श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील , अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकाॅ मनोज गोसावी, दत्ताञय गव्हाणे, पोना ज्ञानेश्वर शिंदे, शंकर चौधरी,  विशाल दळवी, पोकाॅ रविंद्र घुंगासे, प्रकाश वाघ, सागर ससाणे, रोहित येमूल, चापोहेकाॅ बबन बेरड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.


Post a Comment

0 Comments