Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

खाद्य तेलाचा अपहार प्रकरणातील मुख्य सुत्रधार फरार आरोपी नगरमध्ये अटक ; एलसीबीची कारवाई

  
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
अहमदनगर- खाद्य तेलाचा अपहार प्रकरणातील मुख्य सुत्रधार फरार आरोपी  याला अहमदनगर शहरात पकडण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. किशोर मारुती पढदूने (रा. वय ३२, रा. सप्तश्रृंगी कॉलनी, २३९/४, बजाजनगर, बाळूंज एमआयडीसी, औरंगाबाद) असे पकडण्यात असलेल्याचे नावे आहे. 
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, संगमनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो नि अनिल कटके यांनी दिलेल्या सूचनेनुसार  पथकातील सपोनि सोमनाथ दिवटे, पोसई गणेश इंगळे, पोहेकाॅ संदीप पवार, सखाराम मोटे, संदीप घोडके, पोना  शंकर चौधरी, पोकाॅ  सागर सुलाने, विजय धनेधर आदिंच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
याबाबत समजलेले माहिती अशी की, ए. के.टी. लोजिस्टोक कंपनी या नावाने ट्रान्सपोर्ट व्यवसाय आहे.सदर ट्रान्सपोर्ट कंपनी ही सुरत येथील अदानी कंपनीमधून खाद्यतेलाची वाहतूक करते.  ट्रान्सपोर्ट कंपनीने मोडासा ट्रान्सपोर्ट रोड लाईन्स, सुरत यांचे मार्फतीने ट्रक ( एमएच १७ एजी ७७८९) या ट्रकमध्ये ३० लाख ६ हजार ५७१ रु. किं. चे फोर्चून सोयाबीन ऑईलचे खाद्य तेलाचे डबे भरुन सदरचा माल वसंत ट्रेडींग कंपनी (पुणे) येथे पोहोच करण्यासाठी ट्रक चालक  अरुण उदमले, (रा. पोखरी हवेलो, ता. संगमनेर) व  अफजलखान साहेबखान पठाण (रा. मोमीनपुरा, संगमनेर) यांचे ताब्यात दिला असता  सदरचा माल पुणे येथे पोहोच न करता सदर मालोची परस्पर विल्हेवाट लावून अपहार केला होता, या अशोककुमार रामनिवास चौधरी (रा. विष्णूनगर सोसायटी, इच्छापूर बस स्टॉप नं. २, सुरत शहर गुजरात) यांच्या फिर्यादीवरून 
 संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुरनं. २९५/२०२१ भादवि कलम ४०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दाखल गुन्ह्याचा तपास सुरु असताना 
 किशोर पडदूने (रा. औरंगाबाद) हा अपहार करणारा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु सदरचा आरोपी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला होता. आरोपीचा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक शोध घेत होते. परंतु  आरोपी हा वेळोवेळी आपले राहण्याचे ठिकाणे बदलत होता. पथकातील अधिकारी व अंमलदार हे आरोपीचा शोध घेत असताना पोनि अनिल कटके यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली कि, आरोपी किशोर पडदूने हा अहमदनगर शहरामध्ये एकविरा चौक, पाईपलाईन रोड परिसरामधील एका इमारतीमध्ये भाड्याने फ्लॅट घेऊन रहात आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली.
 एकवीरा चौक, पाईपलाईन रोड येथे जावून आरोपीची वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून आरोपी किशोर पढदूने याला ताब्यात घेतले. त्याचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याचावरील गुन्ह्यामध्ये सहभाग असल्याने निष्पन्न झाल्याने आरोपीस संगमनेर शहर पो.स्टे. येथे हजर करण्यात आले आहे. पुढील कार्यवाही संगमनेर शहर पोलिस करीत आहेत.
आरोपी किशोर पडदूने हा सराईत गुन्हेगार असून त्याचे विरुध्द यापूर्वी फसवणूक, अपहार, बेकायदा हत्यार बाळगणे, मारामारी अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत.


Post a Comment

0 Comments