Ticker

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

ॲड प्रताप ढाकणे यांचा अभिष्टचितंन सोहळा उत्साहात

 
ऑनलाईन न्यूज नेटवर्क
नगर रिपोर्टर 
पाथर्डी - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ॲड.प्रताप ढाकणे यांच्या अभिष्टचितंन सोहळानिमिताने अध्यक्षस्थानी आ.रोहित पवार याच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी  अहमदनगर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आमदार चंद्रशेखर घुले, शेवगाव पंचायत समिती सभापती क्षितीज घुले, शिवशंकर राजळे, संभाजी पालवे आदिसह सर्व पक्षातील पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या वतीने आ.रोहित पवार यांचा श्री ढाकणे  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तर उर्वरित मान्यवरांचा जि.प.सदस्या प्रभावती ढाकणे,  ॠषिकेश ढाकणे व सिध्देश ढाकणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील कोविड सेंटरच्या माध्यमातून चांगली कामगिरी करणा-या डाॅक्टर्स यांना सन्मानित करण्यात आले.
 यावेळी प्रास्ताविक केदारेश्र्वर साखर कारखान्याचे तज्ञ्ज संचालक ॠषिकेश ढाकणे यांनी केले. श्री ढाकणे यांच्या अनेक मिञांनी मनोगत व्यक्त केला. यावेळी जिल्ह्यातील मिञवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.Post a Comment

0 Comments